Pune budget funding : खासदार होणाऱ्या पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या, 'आई म्हणून वाटते...'

Pune development funds News : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सरपंच प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी कार्यशाळा कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली.
Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री असताना पुण्याला भरभरून असा निधी मिळत होता. मात्र, यंदाच्या अंदाजपत्रकात पुण्याला कमी निधी मिळाला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दादांच्या माघारी पुण्याला आता निधीची टंचाई होणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाष्य केले आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सरपंच प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी कार्यशाळा कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमा दरम्यान बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'शुक्रवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणसाठी भरीव तरतूद केली आहे. अनेकांना लाडक्या बहीण योजनेचा पुढे काय होणार असे वाटत होते. मात्र, आता या अंदाजपत्रकात या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.'

Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
BJP Politics: भाजपमध्ये बंडखोरांच्या परतीचा मेळा; आयाराम नगरसेवकांच्या राजकारणात खळबळ

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) पुढे म्हणाल्या, 'दादांनी पुणे जिल्हाच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांनी आयुष्भर प्रयत्न केले. अर्थसंकल्प आणि डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून हा विकास साधला. आता त्यांच्या या विकासाचा वारसा पुढे घेऊन जायचा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना पुण्याला कमी निधी मिळाला असल्याबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत विचारला असता त्यांनी पुण्याला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

पार्थ पवार हे राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यांना कोणता सल्ला द्याल, याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. त्यासोबतच अतिशय अनुभवी मंडळींचे हे सभागृह आहे. तिथे जाताना आपण सगळ्याच गोष्टी जाणकार म्हणून शिकून घेणे महत्त्वाचे आहे. येथून पुढे तो चांगली कामगिरी करेल, असे मला आई म्हणून वाटते.'

Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Baramati NCP Politics : बारामती मधील 'या' संस्थेला अजितदादांचे नाव देण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा विरोध

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत आहेत. त्याबाबत विचारले असता सुनेत्रा पवार म्हणल्या, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा अनेक एजन्सीकडून तपास करण्यात येत आहे. संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण यावर बोलू शकतो.'

Ajit Pawar, Parth Pawar, Sunetra Pawar
Congress News : गटनेता अडचणीत, ‘धनी’ मोकाट? स्थायी समिती प्रकरण तापले; प्रदेशाध्यक्षांची कारणे दाखवा नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com