वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET परीक्षेच्या पेपरफुटीच्या चर्चेमुळे देशभरात पुन्हा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, ही पहिलीच घटना नाही. गेल्या दशकभरात देशातील अनेक मोठ्या भरती आणि शैक्षणिक परीक्षांचे पेपर लीक झाल्याचे समोर आले असून काही परीक्षा रद्द कराव्या लागल्या, तर काहींची फेरपरीक्षा घेण्यात आली. NEET, SSC, REET, UPTET, HSC, AIPMT यांसारख्या अनेक महत्त्वाच्या परीक्षा या वादात सापडल्या होत्या.
2014 मध्ये CPMT परीक्षेच्या पेपरफुटीपासून सुरू झालेली ही मालिका 2015 मधील AIPMT, 2016 मधील UPPSC आणि NEET वाद, 2017 मधील SSC आंदोलन, 2018 मधील CBSE पेपरफुटी, 2019 मधील रेल्वे भरती परीक्षा, 2020 मधील कर्नाटक PU परीक्षा, 2021 मधील UPTET आणि MHADA भरती, 2022 मधील BPSC आणि REET, तर 2023 मधील SSC, HSC आणि विविध राज्यांतील भरती परीक्षांपर्यंत सतत सुरूच राहिली.
अनेक प्रकरणांमध्ये परीक्षा रद्द करण्यात आल्या, फेरपरीक्षा घेण्यात आल्या, तर काही ठिकाणी CBI आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशाही सुरू झाल्या. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा देत असताना पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले. त्यामुळे आता केवळ चौकशी नव्हे, तर पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणाली उभारण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा हिंदी विषयाचा पेपर फुटल्याची घटना समोर आली.याच वर्षी असिस्टंट इंजिनिअर भरती परीक्षेदरम्यानही पेपरफुटी झाली. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आणि उमेदवारांचे भविष्य अनिश्चिततेत अडकले.
हायस्कूल परीक्षेदरम्यान जनरल सायन्स आणि इंग्रजी विषयांचे पेपर फुटले.त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणाची CBI चौकशीही करण्यात आली.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली.
राजस्थान एलिमेंटरी टीचर (REET) परीक्षेचा पेपर लीक झाला.
लेखपाल भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झाला.
फॉरेस्ट गार्ड भरती परीक्षेचा पेपर लीक झाला.
आर्थिक गुन्हे शाखेने (EoU) या प्रकरणात 226 जणांना अटक केली.
उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोग (UKSSSC) परीक्षेचा पेपर फुटला.
अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (APPSC) असिस्टंट इंजिनिअर परीक्षेत पेपरफुटी झाली.
डी.एल.एड. (Diploma in Elementary Education) परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली.
कर्मचारी निवड आयोगाची (OSSC) ज्युनिअर इंजिनिअर मुख्य लेखी परीक्षा रद्द करण्यात आली.
शिक्षक पात्रता परीक्षा (UPTET) पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) 14 पदांच्या भरती परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आल्या.
परीक्षेच्या सुरुवातीपूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने NEET परीक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
गुजरात सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (GSSSB) परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप झाला.
हा पेपर तब्बल 15 लाख रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली.
पीयू (PU) परीक्षेचा भौतिकशास्त्राचा पेपर ऑनलाईन व्हायरल झाला.
बंगळुरू विद्यापीठालाही बी.कॉम अंतिम वर्षाची परीक्षा पुढे ढकलावी लागली.
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU)
प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीची चर्चा झाली.
बारावी इंग्रजी विषयाचा पेपर फुटला.
रेल्वे भरती बोर्ड (RRB)
संगणक आधारित परीक्षेच्या (CBT) पेपरफुटीचा आरोप झाला.
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (BSE) मातृभाषा (MIL) विषयाचा पेपर फुटला.
राज्य मंडळाच्या दहावी गणित विषयाचा पेपर लीक झाला.
CBSE
दहावी आणि बारावीच्या गणित व अर्थशास्त्र विषयांचे पेपर फुटले.
दिल्ली
SSC बोर्डाच्या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयांच्या पेपरफुटीची घटना समोर आली.
पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा पेपर लीक झाला.
या प्रकरणात दोन भाजप कार्यकर्ते आणि एका पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली.
देशातील विविध राज्यांमध्ये बोर्ड परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे 1,846 परीक्षा केंद्रांवरील दोन विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.
HSC बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी विषयाचा पेपर फुटला.
SSC परीक्षा
कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) परीक्षेचे पेपर लीक झाल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
सर्वोच्च न्यायालयानेही परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते.
लोकसेवा आयोगाची (UPPSC) समीक्षा अधिकारी (RO/ARO) परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली.
UPPSC ची पीसीएस (PCS) परीक्षाही रद्द करण्यात आली.
NEET परीक्षा
उत्तर प्रदेशात NEET परीक्षेतही गैरप्रकार आणि पेपरफुटीचे आरोप झाले होते.
AIPMT परीक्षा
NEET पूर्वी वैद्यकीय प्रवेशासाठी AIPMT परीक्षा घेतली जात होती.
2015 मध्ये 10 राज्यांत पेपरफुटी झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले.
CBSE ने फेरपरीक्षेला विरोध केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने “एक जरी गैरमार्गाने प्रवेश घेतला तरी परीक्षेची पवित्रता नष्ट होते,” असे स्पष्ट केले.
त्यानंतर फेरपरीक्षा घेण्यात आली.
CPMT परीक्षा
कॉम्बाइंड प्री-मेडिकल टेस्ट (CPMT) परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली.त्यानंतर जुलै 2014 मध्ये फेरपरीक्षा घेण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.