Operation Tiger political controversy: राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हे ऑपरेशन टायगर यशस्वी व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, शेवटच्या क्षणी या सर्व प्लॅनची खबर उद्धव ठाकरे व त्यांच्या नेतेमंडळींना झाली.
त्यामुळेच त्यांनी बोलविलेल्या बैठकीला खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. तर काही खासदारांचा कल सरळ भाजपमध्ये जावे असाच होता. मात्र, या सर्वांवर मात करीत सीएम फडणवीसांच्या 'मास्टरस्ट्रोक' खेळी करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फास्ट चाललेली मोहिम यशस्वी करीत बाजी मारली. त्यांच्या शिष्टाईमुळेच सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सहा खासदारांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. त्यापूर्वी सतत आठ दिवस राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत राहिल्या त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी सेनेतून बंड करणाऱ्या या सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे नव्हते. तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता, असा खुलासा समोर येत आहे. या सहा खासदारांपैकी बहुतांश खासदार हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते. त्यांना शिंदे सेनेत जायचे नव्हते. फुटायचेच आहे तर मग धनुष्यबाण का हातात घ्यायचा, त्यापेक्षा कमळ का नको असा सवाल या खासदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
2024 मधील लोकसभा निकालानंतरच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. त्यातच लोकसभेतील काही अडलेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात फोडाफोडी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
राज्यात या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी बोलावविलेल्या बैठकीला सर्व खासदार हजर झाले होते. कोणी ऑनलाईन हजर होते. तर कोणी मातोश्रीवर उपस्थित होते. पण अवघ्या चार दिवसानंतरच हे सर्व खासदार फुटल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या सर्व खासदारांनी शिवसेनेत जावे यावर ठाम होते. दिल्लीत त्यांनी याविषयी बोलणी केली होती. दिल्लीतील भाजप (BJP) श्रेष्ठींशी यशस्वी बोलणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल देण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी दोन-तीन बैठका देखील या खासदारासोबत झाल्या होत्या. त्यानंतर पुढील रूपरेषा ठरविण्यात आली.
दुसरीकडे सर्व प्लॅन ठरला होता. त्यानंतर सहाव्या खासदाराने एकनाथ शिंदे आणि भाजपचे टेन्शन वाढवले होते. त्यांच्या मते आम्ही बंड करणार आहोत तर आता भाजपमध्येच प्रवेश द्या, असा या सहाव्या खासदाराचा आग्रह होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. हा खासदार त्यासाठी अडून बसल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर या खासदाराचे मन वळवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठाकरे यांच्या सेनेतील सहावा खासदार सोबत यावा यासाठी फडणवीस यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांनी याकामी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी याविषयीचे संकेतही पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दिली होती.
ऑपरेशन यशस्वी आणि बॉडी सदृढ, अशा शब्दात त्यांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे संकेत दिले होते. ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भूमिका निभावल्याचे आता उघड झाले आहे. त्यांच्यामुळेच फसणारे ऑपरेशन यशस्वी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.