Pankaja munde, Dhananjay Munde  Sarkarnama
महाराष्ट्र

Pankaja Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या,'मी फक्त तुमचं...'

Pankaja Munde statement News : मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर आपण राजीनामा देऊ, असे सांगितले. तर या प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडेंनी मोठे विधान केले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 51 दिवस झाले आहेत. या हत्येनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून केला जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणांतील आठ आरोपीच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर आपण राजीनामा देऊ, असे सांगितले. तर या प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडेंनी मोठे विधान केले आहे.

मंत्री धनंजय मुंडे बुधवारी दिल्ली येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रालयाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो असल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात असतानाच आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देणे टाळले. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल विचारण्यात आले त्यावर पंकजा मुंडे या म्हणाल्या, 'मी फक्त तुमचे ऐकून घेतले, असे म्हणत पंकजा मुंडे या निघून गेल्या. थोडक्यात काय तर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल भाष्य करणे टाळले आहे.

पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्थितीवर अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाली. बीडशी संबंधित नियोजन समितीच्या बैठकीबाबतीत चर्चा झाल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर माझे त्यांच्या कुटुंबियांशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडे या सावध भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळते. दुसरीकडे आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप करण्यात आले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT