Ajit Pawar, Ramdas Athawale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athawale : अजितदादा युतीत आले अन् त्यांचाच विस्तार झाला..! रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत...

Meeting at Sangli Government Rest House : प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करुन सोबत यावे.

Umesh Bambare-Patil

Ramdas Athawale : रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर 'एनडीए'सोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी 'आरपीआय'ला ताकद देण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ, असे सांगण्यात आले मात्र, अजितदादा येताच त्यांचा विस्तार झाला अन् आमचा रखडल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करुन सोबत यावे. पक्षाच्या अध्यक्षपदासह माझे मंत्रिपद देवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सांगली (Sangali) शासकीय विश्रामगृहात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत रामदार आठवले (Ramdas Athawale) बोलत होते. ते म्हणाले, दलित मतांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले मात्र, अजितदादा येताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु आमचा विस्तार बाजुलाच पडल्याची खंत आहे. राज्यात किमान एक मंत्रिपद मिळाले पाहिजे, याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ऐक्य करायचे असेल तर खालच्या पातळीवर एकत्र आले पाहिजे.

गावागावात एकत्र आहोत का ? आपण एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहते का ? त्यामुळे लोक जर एकत्र आले तर आम्ही ऐक्य करण्यास तयार आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित आघाडी बरखास्त करुन महायुतीमध्ये यावे. त्याना माझे मंत्रिपद मी द्यायला तयार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चार पक्षांचे बारा वाजतील...

प्रकाश आंबेडकर हे सक्षम आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा तो अधिकार त्यांचा आहे. ते महायुती सोबत येणार नाहीत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत जावे. चार पक्षांनी जरी बारा - बारा जागा वाटून घेतल्या. तर त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला आठवले यांनी लगावला.

संजय राऊत म्हणतात, राम मंदिरचा सोहळा भाजपचा आहे. हा सोहळा बीजेपीचा नाही. हा सोहळा राम मंदिर ट्रस्टने ठेवला आहे. ज्यांना ज्यांना रामाबद्दल आदर आहे. त्यांनी दर्शनाला जावे. सगळे गेले की मीही जाईन. मी बुद्धिस्ट असलो तरी मी बाबासाहेबांच्या संविधानाला मानणार आहे. त्यामुळे मला निमंत्रण आले तर मी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीला यश मिळणार नाही...

इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी इंडिया आघाडीला यश मिळणार नाही. 2024 च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाणार आहे. यावर्षी 400 च्या पुढे जागा मिळतील. ‘अबकी बार, पुन्हा मोदी सरकार’ असा लोक नारा देत आहेत. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला असल्याचे आठवले यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT