Nana Patole News : खाकी वर्दीवर हात टाकण्याची हिंमत येते कुठून? पटोलेंनी घेतला समाचार...

Nana Patole News : राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत सदर आमदारावर कठोर कारवाई करावी.
Nana Patole News
Nana Patole News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिल्लोड महोत्सवात राडा घडून आला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्याच मतदारसंघातील नागरिक आणि तरुणांवर पोलिसांना काठ्या चालवण्याचे आदेश सत्तारांनी जाहीरपणे दिले होते. तर आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाच्या थोबाडीत मारल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांवर कसलाही अंकुश नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे. (Latest Marathi News)

Nana Patole News
NCP MLA Disqualification Timetable : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रसंदर्भातील वेळापत्रक जाहीर; कशी आहे प्रक्रिया?

यावर नाना पटोले म्हणाले, "काल परवा अब्दुल सत्तारांचा एका कार्यक्रमातील अश्लाघ्य भाषा असलेला व्हिडिओ प्रसार माध्यमांसोर आला आणि आज महाराष्ट्रात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस अधिकाऱ्याला श्रीमुखात मारण्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व कृत्य यांचा सत्तेचा माज व भाजपच्या घाणेरड्या संस्कृतीचे दर्शन घडवते, जन समुदायासमोर काय बोलावे आणि कायद्याच्या रक्षकांशी कसा व्यवहार करावा हे लोक प्रतिनिधींना जर समजत नसेल तर, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे, अशा शब्दात पटोलेंनी टीका केली.

थेट खाकी वर्दीलाच सत्ताधारी पक्षाचा आमदार हात घालण्याची भाषा करत असेल तर हा फार गंभीर प्रकार आहे.खाकी वर्दीवर हात घालण्याची हिंमत या सत्ताधारी आमदारामध्ये आलीच कशी ? यांची हिंमत कशी होते? याचा बंदोबस्त झाला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत सदर आमदारावर कठोर कारवाई करावी, असे नाना पटोले म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com