Dattatray Bharane-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीचं 'डॅमेज कंट्रोल' फ्लॉप : दत्तामामांच्या बैठकीला दोन माजी आमदारांची 'दांडी' !

Ajit Pawar faction crisis News : सोलापूर जिल्ह्यातील मित्रपक्षाचे चार आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातील काही नेतेमंडळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने हे डॅमेज कंट्रोलसाठी थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवले होते.

सरकारनामा ब्युरो

Solapur News : महायुतीमधील मित्रपक्षात सुरु असलेली अतंर्गत धुसफूस आता समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना आतापर्यंत महाविकास आघाडीतून जोरात इनकमिंग महायुतीकडे होत होते. मात्र आता महायुतीमधील मित्रपक्षावरच कुरघोडीचा प्रकार सुरु असल्याने वातावरण तापले आहे. मित्रपक्षातील माजी आमदाराच गळाला लावले जात असल्याने मोठी चुरस पाहवयास मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मित्रपक्षाचे चार आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातील काही नेतेमंडळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने हे डॅमेज कंट्रोलसाठी थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, या बैठकीला तीन पैकी दोन माजी आमदारांनी दांडी मारल्याने राष्ट्रवादीचे 'डॅमेज कंट्रोल' फ्लॉप ठरल्याची चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykuamar gore) यांनी सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरु केले आहे. त्या अतंर्गत पाच माजी आमदारांना गळाला लावले आहेत. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार बबनराव शिंदे पुत्र रणजीत शिंदे हे सध्या टार्गेटवर आहेत. हे तीन माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित आहेत. त्यामुळे हे तीन माजी आमदार भाजपमध्ये गेल्यास त्याचे परिणाम येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होणार असल्याने राष्ट्रवादीचे 'डॅमेज कंट्रोल' रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे डॅमेज कंट्रोलसाठी थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवले होते. त्यासाठी मंगळवारी दुपारी माजी आमदार संजय शिंदे यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाराजी दूर करण्यासाठी तीन माजी आमदारांना बोलावले होते. मात्र, या बैठकीस माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजीत शिंदे वगळता इतर दोन माजी आमदारांनी मात्र दांडी मारल्याचे दिसून आले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी आमदार बबन शिंदे आणि रणजीत शिंदे यांचे नाव घेत अजित पवारांनी तुम्हाला काय काय मदत केली याची आठवण करून दिली. त्यासोबतच येत्या काळात अजित पवार यांना साथ देण्याची साद ही घातली.

यावेळी भरणे यांनी पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या माजी आमदारांना अजित पवार यांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठी मदत केली असा दावा त्यांनी केला आहे. मात्र कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी घेतलेल्या या बैठकीला माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने या दोन माजी आमदारांनी दांडी मारल्याने राष्ट्रवादीचे 'डॅमेज कंट्रोल' फ्लॉप ठरल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हा त्यांचा अश्व रोखण्यात राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना यश मिळणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याने ही फोडाफोडी रोखण्याचे आव्हान महायुतीमधील शिवसनी व राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे.

दत्तामामा पक्ष सोडून गेले तरी...

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यांनी आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतल्याचे सांगत सर्वांनी एकत्रित येऊन निवडणुकीचे नियोजन करावे राज्यातील तीन पक्षाचे सरकार हे या निवडणुकीत महायुतीतून लढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे परंतु ऐनवेळी जर युती न झाली तर 102 जागेवर आपण तयारी ठेवावी अशा सूचना केल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेत चार माजी आमदार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर भरणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आले. तेव्हा भरणे यांनी दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडत नाही. पक्षाची दुसरी यंत्रणा तयार असते असे सांगत अजून तरी कोणी पक्ष सोडून गेलेला नाही, त्यांचा दादांवर आणि दादांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा जर गैरसमज झाला असेल तर तो दूर केला जाईल. भविष्यात पक्षांमध्ये अनेक प्रवेश होणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष एक संघ आहे आणि राहणार असा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT