Shivsena Politic's : नगराध्यक्षपदावर शिवसेनेच्याच अनेकांचा डोळा, मंत्री उदय सामंत यांच्या भावाची लागणार कसोटी

Lanja Nagar Panchayat Election : लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठीचे आरक्षण निश्चित झाले आहे. यानंतर आता मोठ्या राजकीय हालचाली येथे पाहायला मिळत आहेत.
Lanja Nagar Panchayat Election Uday Samant and Kiran Samant
Lanja Nagar Panchayat Election Uday Samant and Kiran Samantsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. लांजा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित झाले आहे.

  2. शिंदे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून नेते उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांची डोकेदुखी वाढणार आहे.

  3. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडणे हे दोन्ही सामंत बंधूंना कठीण आव्हान ठरणार आहे.

Ratnagiri News : लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठीचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदावरून आता रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या वेळी नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. नगराध्यक्षपदासाठी अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेना शिंदेगटाकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. अनेकजणांनी तर नगराध्यक्षपदावर डोळा ठेवूनच पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवड करताना पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांची कसोटी लागणार आहे.

गेल्या सात महिन्यांपासून प्रशासकीय कारभार असलेल्या लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. या वेळी नगराध्यक्ष तसेच नगरपंचायतीच्या 17 पैकी 9 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे या वेळी नगरपंचायतीवर महिलाराज येणार आहे. यामुळे लांजा नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी येथे शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. या गर्दीतून तो जिंकून येईल अशांना उमेदवारी दिली जाईल. तर नगराध्यक्षपदासाठी वेगळे राजकारण खेळले जाऊन नवीन चेहऱ्याला आमदार संधी देतील, अशी चर्चा येथे केली जातेय.

सध्या सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सद्यःस्थितीत शिवसेना (ठाकरे), भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांपेक्षा शिवसेना शिंदेगटाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या ही सर्वाधिक आहे. यातील अनेकजणांनी आपल्या पत्नीलाच उमेदवारी मिळणार, असे यापूर्वीच ठासून सांगितलेले आहे.

Lanja Nagar Panchayat Election Uday Samant and Kiran Samant
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी नाशिकला पुन्हा येईल, भगवा फडकवुनच जाईल'

तर काहीजणांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश करण्याअगोदरच आपल्यालाच नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळेल, या तडजोडीने पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गटांमध्येच नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपल्यालाच तिकीट देणार असल्याचे आपल्याला सांगितले होते, असे अनेकजण छातीठोकपणे आता सांगताना दिसत आहेत. नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भलीमोठी संख्या असल्याने नगराध्यक्षपद कोणाच्या पदरात पडणार, याकडे लांजावासियांचे लक्ष लागले आहे. या सर्व इच्छुकांमधून आमदार किरण सामंत हे या पदासाठी कोणाची निवड करतात किंवा कोणावर या पदासाठी विश्वास टाकतात? हे आगामी काळात कळेल.

नगराध्यक्षपदासाठी निवड करणे हे आमदार किरण सामंत यांच्यासमोर एक कठीण आव्हान असणार आहे. मागील नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर शहरातील नागरिकांमध्ये असलेला प्रचंड रोष लक्षात घेता आमदार किरण सामंत हे प्रस्थापित उमेदवारांपेक्षा एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विरोधी पक्षाकडूनदेखील चाचपणी

विरोधी पक्षाकडूनदेखील नगराध्यक्षपदासाठी आपापल्या उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सद्यःस्थितीत लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रात आणि एकूणच तालुक्यात शिंदेगटाचा प्रभाव आहे. त्याचा फायदा निश्चितच नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Lanja Nagar Panchayat Election Uday Samant and Kiran Samant
Shivsena UBT Politics : तळकोकणात शिवसेनेचा मास्टर मूव्ह, शिंदेंसह महायुतीची डोकेदुखी वाढणार? आगामी स्थानिकसाठी भास्कर जाधवांसह आता मुलगाही मैदानात

FAQs :

1. लांजा नगरपंचायतीसाठी आरक्षण कधी निश्चित झाले?
लांजा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे आरक्षण नुकतेच निश्चित झाले आहे.

2. या आरक्षणानंतर शिंदे गटात काय सुरू आहे?
शिंदे गटातील उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

3. उदय सामंत आणि किरण सामंत कोणत्या पक्षाचे आहेत?
दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) चे नेते आहेत.

4. नगराध्यक्ष पदासाठी किती तणाव आहे?
उमेदवार निवड ही दोन्ही नेत्यांसाठी राजकीय आणि गटांतर्गत दृष्ट्या मोठं आव्हान ठरत आहे.

5. या वादाचा स्थानिक निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो का?
होय, अंतर्गत संघर्षामुळे शिंदे सेनेच्या विजयावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com