Solapur, 27 October : सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित पंढरपूर-मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघाची उमेदवारी अखेर रविवारी (ता. 27 ऑक्टोबर) रात्री उशिरा जाहीर झाली आहे. ही दोन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडे गेले आहेत. काँग्रेसने पंढरपुरातून भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली असून दक्षिण सोलापूरमधून माजी आमदार दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेस पक्षाने विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. आजच्या उमेदवार यादीत चौदा जणांना संधी देण्यात आलेली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात पंढरपूर-मंगळेवढा आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. सोलापूर दक्षिणमधून माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दिलीप माने यांना काँग्रेसने (Congress) दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील दोन पक्षाने एकाच मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. माने यांच्या अगोदर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत.
दिलीप माने यांनी यापूर्वी दक्षिण सोलापूरमधून २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी शिवसेनेच्या रतिकांत पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, पुढील २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता. दिलीप माने यांनी पुढची २०१९ ची निवडणूक शिवसेनेत प्रवेश करून सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून लढवली होती. मात्र, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार की शिवसेना माघार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी पंढरपूर पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा सामना आमदार समाधान आवताडे यांच्याशी झाला होता. मात्र, पोटनिवडणुकीत भालके यांचा निसटता पराभव झाला होता. आता त्यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडेही उमेदवारी मागितली हेाती. त्यानुसार त्यांना काँग्रेसकडून पंढरपूर मंगळेवढ्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.