Pandharpur Constituency : परिचारकांची माघार कोणाच्या पथ्यावर...महाआघाडीची उमेदवारी कोणाला?

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीची उमेदवारी भगीरथ भालके यांना मिळणार की आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत बाजी मारणार, हे उद्यापर्यत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 October : माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे समाधान आवताडे यांचा मार्ग निर्धोक झाल्याचे मानले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचा पंढरपूरचा उमेदवार अद्याप ठरू शकलेला नाही. पंढरपूर मतदारसंघ कोणाला सुटणार, यावरच उमेदवारीची गणिते अवलंबून आहेत.

महाविकास आघाडीची उमेदवारी भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना मिळणार की आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत बाजी मारणार, हे उद्यापर्यत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच, परिचारक यांची माघार नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हेही पाहावे लागणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून (Pandharpur-Mangalvedha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. यात पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, भगीरथ भालके, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचा समावेश आहे.

यातील बहुतांश नावे मागे पडली असून अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांच्या नावावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यातही हा मतदारसंघ कोणाला सुटतो, यावरच या मतदारसंघातील उमेदवारीची समीकरणे अवलंबून आहेत.

Bhagirath Bhalke
Malshiras : माळशिरसमध्ये भाजपचे धक्कातंत्र; जानकरांविरोधात माजी खासदाराच्या मुलाचे नाव आघाडीवर!

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटला, तर त्यांच्याकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी पुढाकार घेतला होता, त्यामुळे पंढरपूर मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर भालके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंढरपूरचा आपला हक्क कायम ठेवला तर मात्र त्यांना अनिल सावंत यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, बावनकुळे यांच्या भेटीनंतर परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे ही भगीरथ भालके यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा मार्ग प्रशस्त झाल्याची चर्चा आहे.

Bhagirath Bhalke
Sanjay Kshirsagar : लोकसभेला भाजपने, तर विधानसभेला पवारांनी डावलले; संजय क्षीरसागरांची भूमिका काय?

महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी भालके यांना अनिल सावंत यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. मात्र, परिचारक यांनी घेतलेली माघार त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पचलेली नाही. त्यातून त्यांनी शनिवारीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिचारक वाड्यावर असतानाच काही कार्यकर्त्यानी आवताडे यांना मदत न करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे परिचारक यांची माघार भगीरथ भालके यांच्या पथ्यावर पडणार की आवताडे यांना फायदा होणार, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com