Anant Jadhav BJP candidate hospitalized after collapsing at rally Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Candidate Collapses: भाजप उमेदवाराला प्रचारादरम्यान आली भोवळ; कार्यकर्त्यांची एकच धावपळ, तातडीने दाखल केले रुग्णालयात

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक चारमधील भाजप उमेदवार अनंत जाधव यांना भोवळ आली. कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 08 January : सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. उमेदवार तहान भूक विसरून प्रचारात व्यस्त आहेत. प्रभाग क्रमांक चारमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनंत जाधव यांना आज (ता. 08 जानेवारी) दुपारी बाराच्या सुमारास प्रचारादरम्यान भोवळ आली. कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने मार्कडेय रुग्णालयात दाखल केले आहे.

अनंत जाधव हे सोलापूर (Solapur) महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी दिवस कमी असल्याने उमेदवार हे सकाळपासूनच घराबाहेर पडत आहेत. रॅली, कोपरा सभा आणि गाठीभेटींवर उमेदवरांकडून भर दिला जात आहे. प्रभाग मोठे असल्याने प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होत आहे.

प्रभाग चारमधून अनंत जाधव हे भाजपचे (BJP) अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी आज प्रचारासाठी रॅली काढली होती. जाधव यांची रॅली तुळजापूर वेस येथील नगरेश्वर मंदिराजवळ आली. रॅलीत कार्यकर्त्यांची गर्दी होती. नगरेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर जाधव यांना भोवळ आली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

जाधव यांना भोवळ आल्याने कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. प्रसंगावधान राखून भाजप कार्यकर्त्यांनी अनंत जाधव यांना सोलापूरमधील मार्कडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अनेक उमेदवार प्रचारासाठी आहाराचे नियोजन न करता धावपळ करत आहेत. प्रचाराच्या काळात त्यांचे आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसते, त्यातून अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, त्यामुळे राजकारण करत असताना उमेदवारांनी आपल्या आरोग्याकडेही तेवढचे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT