

Thane News : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत भाजपने मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधत काँग्रेसमुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली होती, मात्र आता भाजपनेच काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ नगरपालिकेतील 12 नगरसेवकांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत आपण काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीच माहिती न देता भाजपसोबत हातमिळवणी करीत युती केली आहे. ही बाब चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच आपली ब्लॉक काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने काँग्रेसला (Congress) सोबत घेत अभद्र युती केली आहे. या युतीवर सत्ताधारी व विरोधी पकसहकडून टीका केली जात असल्याने वातावरण तापले आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. असे असताना भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधून भाजपने बहुमत मिळवले आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्या भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असे भाजप (BJP) उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकला होता. याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या विजयी झाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.