Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Samadhan Autade : आमदार समाधान आवताडेंच्या मंगळेवढ्यात केवळ 10 गावांत भाजपला मताधिक्क्य!

MangalvedhaPolitics : लोकसभेची निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. विधानसभेसाठी इच्छुकांनी सावध पवित्रा घेत प्रचार यंत्रणा हाताळली. कारण, भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले, तर ते कुणामुळे, हाच सर्वात मोठा प्रश्न होता.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 07 June : भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांचा गृहतालुका असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील फक्त 10 गावांत भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले आहे. उर्वरीत गावांत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिड मिळाला आहे. शिंदे यांना मिळालेल्या लीडमुळे आमदार आवताडे यांची डोकेदुखी वाढविणारे आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांना 45 हजारांचे मताधिक्य मिळाले असले तरी काँग्रेस पक्षाकडे सध्या सक्षम चेहरा कोणी नाही. लोकसभेची निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. विधानसभेसाठी इच्छुकांनी सावध पवित्रा घेत प्रचार यंत्रणा हाताळली. कारण, भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाले, तर ते कुणामुळे, हाच सर्वात मोठा प्रश्न होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी प्रमुख दावेदार होते. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विठ्ठल कारखान्यावरील कारवाईमुळे त्यांनी भाजपच्या उमेदवाराला समर्थन दिले. मात्र, मतदारसंघात त्याचा उलट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या गटाचा मेळावा घेत आपण भाजपसोबत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर दोन-चार गावांत कार्यकर्त्यांच्या निवडक बैठकाही घेतल्या. आमदार आवताडे यांनीही घोंगडी बैठकांवर जोर दिला. मात्र,आमदारांच्या बैठकांचाही फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते.

महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख पदाधिकारी हे मंगळवेढा शहरात राहतात. या महायुतीच्या नेत्यांच्या गावांतही भाजपला कमी मताधिक्य मिळाले. दामाजी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या हिवरगावमध्ये, शिवनगीत भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, रहाटेवाडी, बावची, सोड्डी, सिध्दापूर, अरळी याच गावांत भाजप उमेदवार राम सातपुते यांना आघाडी मिळाली आहे.

भाजप उमेदवाराला तळसंगी (शिवानंद पाटील) फटेवाडी (औदुंबर वाडदेकर) येथेही कमी मताधिक्य मिळाले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या गावातही तीच परिस्थिती आहे. मरवडेत (लतीफ तांबोळी) काँग्रेस उमेदवाराला चौदाशेपेक्षा अधिक मताचे मताधिक्य मिळाले.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अशोक चौंडे, नंदेश्वरमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. भगीरथ भालके यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यांनी निवडक गावातील सभांना हजेरी लावली. सध्या ते बीआरएसमध्ये असून विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांच्यासमोर पक्ष निवडण्याचे आव्हान राहणार आहे.

सध्या विधानसभेसाठी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, भगीरथ भालके ही चौघे इच्छुक आहेत. काँग्रेस उमेदवाराला या मताधिक्यातून 45 हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा कदचित काँग्रेस पक्षसुद्धा मागू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT