Ajit Pawar-Supriya Sule :सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; अजितदादांची राजकीय इनिंग सुरू झालेल्या संस्थेत घातले लक्ष!

Chhatrapati sugar factory Election : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांची राजकीय कारकिर्द ही छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून झालेली आहे. त्यामुळे या दोघांचे छत्रपती कारखान्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे.
Supriya Sule-Ajit Pawar
Supriya sule-Ajit pawarSarkarnama

Indapur, 07 june : बारामतीतून लोकसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकलेल्या सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय इनिंगची सुरुवात झालेल्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे सुप्रिया सुळे आता अजितदादांचे वर्चस्व असलेल्या प्रत्येक संस्थांमध्ये लक्ष घालणार, असेच दिसून येते.

इंदापूर शहरात झालेल्या सत्कार समारंभात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ही भावना बोलून दाखवली. छत्रपती कारखान्याची (Chhatrapati sugar factory) निवडणूक लढवायची, जिंकायची आणि कारखाना रूळावर आणायचा, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. सुळे यांच्या या घोषणेमुळे अजित पवारांचे (Ajit Pawar) एकहाती वर्चस्व असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती सहकारी साखर कारखाना हा इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवर आहे. दोन्ही तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव राखून असणारा हा साखर कारखाना आहे. संपूर्ण इंदापूर तालुका आणि बारामतीमधील ५३ गावे हे छत्रपती साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. गेली अनेक वर्षांपासून कारखान्यावर पवार घराण्याच्या विचाराची सत्ता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांची राजकीय कारकिर्द ही छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून झालेली आहे. त्यामुळे या दोघांचे छत्रपती कारखान्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह विद्यमान संचालक मंडळाने अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कारखान्यावर सध्या अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व आहे.

Supriya Sule-Ajit Pawar
Ajit Pawar : वाह क्या बात है...! दिल्लीत अजितदादांना मानाचं मान!

लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून २५ हजार ९५१, तर बारामती तालुक्यातून ४७ हजार ३८१ मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे इंदापूर आणि बारामतीवर अजूनही शरद पवारांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. पवारांना मानणारा मोठा वर्ग दोन्ही तालुक्यांत असल्याचे लोकसभेच्या निकालावरून दिसून येते.

आता सुप्रिया सुळे यांनी छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीतच याची चुणूक दिसून येत होती. त्यानुसार निवडणुकीचा निकाल लागताच सुप्रिया सुळे यांनी छत्रपती कारखान्याची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

राज्यातील इतर सहकारी संस्थांप्रमाणे इंदापूरमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेली चार वर्षांपासून रखडली आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ११ मे २०२० रोजी संपली आहे. मात्र, कारखान्याचे क्रियाशिल व अक्रियाशिल मतदारावरून उच्च न्यायालयात वाद सुरू आहे. कोर्टातील याचिका आणि काेरोनामुळे गेली चार वर्षे छत्रपती कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली आहे. काखान्याची अंतिम यादी आतापर्यंत चार वेळा प्रसिद्ध करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात येत्या ११ जून अंतिम मदारायादीवर सुनावणी होणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Supriya Sule-Ajit Pawar
Ramtek's Defeat Effect : रामटेकचा पराभव भाजपच्या जिव्हारी; एका आमदाराचे तिकिट कापणार, दुसऱ्याची मंत्रिपदाची संधी हुकणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com