Solapur, 10 Augusat : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. अभिजित ढोबळे हे मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या बार्शीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
माजी आमदार लक्ष्मण ढोबळे हे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असून मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये मोहोळ मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, हे निश्चित मानले जात आहे, त्यामुळे भाजपमध्ये असलेले लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे (Abhijeet Dhoble) यांना मोहोळमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इतर पक्षाचा सहारा घ्यावा लागणार आहे.
शरद पवार हे लक्ष्मण ढोबळे यांच्या मुलाला आपल्या पक्षातून विधानसभेचे तिकीट देणार का, हा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडल्यानंतर लक्ष्मण ढोबळे यांनी पवारांवर टीका केली होती, त्यामुळे पवार हे सर्व विसरून अभिजित ढोबळे यांना निवडणुकीसाठी पावन करून घेणार का काय हा खरा प्रश्न आहे.
अभिजित ढोबळे यांनी काही दिवसांपूर्वी मोहोळ मतदारसंघातून यात्रा काढली होती, त्यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी विधानसभेची तयारी चालवल्याचे दिसून आले होते. गावोगावी जाऊन त्यांनी प्रचाराची एक फेरी ढोबळे यांनी पूर्ण केल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीची तयारीसाठी त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटणार आणि त्यातून अभिजित ढोबळे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळणार का हा खरा प्रश्न आहे.
अभिजित ढोबळे यांनी टायमिंग साधलं
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. बार्शी येथील शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी अभिजित ढोबळे यांनी जयंत पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.