Video-Naresh Mhaske : ‘विशाल पाटील-विश्वजित कदमांच्या भेटीवेळी ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना बंगल्याबाहेर ताटकळत उभे केले....’

Uddhav Thackeray Meet Vishal Patil : उद्धव ठाकरे यांचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला आहे. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण, काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही.
Uddhav Thackeray-Naresh Mhaske-Chandrahar Patil
Uddhav Thackeray-Naresh Mhaske-Chandrahar PatilSarkarnama
Published on
Updated on

Thane, 10 August : सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या बैठकीवेळी ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना बंगल्याबाहेर ताटकळत ठेवले होते, असा दावा म्हस्केंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिल्लीत जाऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यावरून महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरेंना टार्गेट केले जात आहे. ठाण्यात तर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत (Delhi) लोटांगण घातलं, असे बॅनर लागले आहेत. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाडल्या जात आहेत.

उद्धव ठाकरे यांचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला आहे. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण, काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. निवडणुकीत लागणाऱ्या पैशासाठी फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे, असा आरोप खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

Uddhav Thackeray-Naresh Mhaske-Chandrahar Patil
Thackeray Vs Shinde : दिल्लीपुढे लोटांगण घालूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत; शिवसेनेचा शिंदे गटावर पलटवार

नरेश म्हस्के म्हणाले, ठाण्यात लागलेल्या उद्वव ठाकरेंच्या लागलेले बॅनर हे बरोबर लागले आहेत. ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात लोटांगण घातलं. एका सांगलीच्या पहिलवानाला तेल लावून लढायला लावलं. मुळात त्या पहिलवानाचा राजकीय छंद नसतानाही ठाकरेंनी त्याला लढायला लावलं. ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी उभा न राहता विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्याबरोबर बैठक घेतली.

चंद्रहार पाटील बंगल्याच्या बाहेर उभा होता आणि ठाकरे हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांशी बैठक घेत होते. एका अपक्ष खासदाराच्या पायाशी ठाकरे यांनी लोटांगण घातलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Uddhav Thackeray-Naresh Mhaske-Chandrahar Patil
Raj Thackeray Vs Shivsena : राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे पदाधिकारी आमचेच; पण.... : शिवसेना नेत्याचा मनसेला इशारा

कोण आहेत चंद्रहार पाटील?

चंद्रहार पाटील हे डब्बल महाराष्ट्र केसरी आहेत. लोकसभा निवडणुकी त्यांनी महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षाकडून सांगली मतदारसंघातून निवडणक लढवली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत लोकसभा निवडणूक लढवली हेाती. त्यात त्यांनी चंद्रहार पाटील यांचा पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com