Sharad Pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Grampanchayat Election Result : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; 'महाविकास'ला फुटीचा फटका

Umesh Bambare-Patil

रद्द Satara Grampanchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सातारच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. अजित पवार गटाला ४१, तर भाजपला ५९, शिंदे गट शिवसेनेला २७ ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीतील शरद पवार गट राष्ट्रवादीला १७, काँग्रेसला चार तर उद्धव ठाकरे शिवसेनेला सहा जागा मिळाल्याचे सांगितले जात आहे. एकूण निकाल पाहता जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेला फुटीचा फटका बसल्याचे चित्र आहे.

सातारा जिल्ह्यातील Satara Politics १३१ ग्रामपंचायतींची Grampanchayat Election निवडणूक होती. त्यापैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर सरपंचपदाचे ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी तर सरपंचपदाच्या १४ जागांसाठी मतदान झाले होते.

निकालात जिल्ह्यात आमदारांच्या स्थानिक गटांनी माोठ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादीच्या दुफळीचा फायदा उठवत भाजपने ग्रामपंचायतीत मुसंडी मारल्याचे चित्र आहे.सातारा व जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने बाजी मारली. जावळी तालुक्यातील २४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, त्या सर्व ग्रामपंचायती शिवेंद्रसिंहराजेंच्या विचाराच्या आहेत.

कुरळोशी, वाघदरे, भामघर (सरपंच), सांगवी (सदस्य-१), बिभवी, आनेवाडी ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजे गटाने बाजी मारली. सातारा तालुक्यातील पोटनिवडणूक झालेल्या कोंडवे (सदस्य- १), पांगारे (सदस्य- १), कोंढवली (सदस्य- १) येथे शिवेंद्रसिंहराजे गटाचा उमेदवार विजयी झाला. तर धावडशी, कारी, लुमाणेखोल, नित्रळ, वडगाव, अंबवडे या ग्रामपंचायतींवरही शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने सत्ता मिळवली.

कऱ्हाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निकालात कऱ्हाड उत्तरमधील आठही ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे, तर कऱ्हाड दक्षिणमधील तीन ग्रामपंचायतींत काँग्रेसने आणि एका ग्रामपंचायतीत भाजपने यश मिळवले आहे. बानुगडेवाडीत १५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई गटाकडे २०, तर चार ग्रामपंचायती पाटणकर गटाकडे, काँग्रेसकडे एक आणि एक अपक्ष असे बलाबल आहे.

कऱ्हाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी आठ, काँग्रेस तीन तर एक ठिकाणी भाजप विजयी झाले आहे. वाई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीपैकी आमदार मकरंद पाटील यांच्या नऊ ठिकाणी विजयी, तर सर्वपक्षीय दोन ठिकाणी विजयी झाले आहेत. माण तालुक्यात चार ग्रामपंचायतींपैकी एक बिनविरोध तर एक राष्ट्रवादी, एक भाजप व एक ठिकाणी भाजप-शिवसेना विजयी झाले आहे.

सातारा तालुक्यात दोन ग्रामपंचायतीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा विजय झाला आहे. कोरेगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी तीन ठिकाणी आमदार महेश शिंदे व दोन शशिकांत शिंदे समर्थक विजयी झाले. जावळी तालुक्यातील पाचपैकी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

फलटण तालुक्यात माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर गटाला दोन, तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाने दोन ग्रामपंचायतींत विजय मिळवला आहे. दऱ्याचीवाडी ग्रामपंचायत राजे गटाने खासदार गटाकडून तर उपळवे ग्रामपंचायत राजे गटाकडून खासदार गटाने खेचून आणली आहे. उपळवे येथील एक उमेदवार अवघ्या एका मताने तर सावंतवाडी येथील एक महिला उमेदवार चिठ्ठीद्वारे विजयी घोषित करण्यात आली आहे.

खटाव तालुक्यात तिन्ही ग्रामपंचायतींत आमदार महेश शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. वाई तालुक्यात ११ पैकी ग्रामपंचायतींपैकी शहाबाग व वेळे येथे परिवर्तन झाले. या ठिकाणी भाजप, शिवसेना, आरपीआय व स्थानिक गट अशा सर्वपक्षीय आघाडीने बाजी मारली. पाचवडमध्ये राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली. मात्र, बहुमत सर्वपक्षीय आघाडीकडे राहिले.

चांदवडीत परिवर्तन होऊन राष्ट्रवादीची सत्ता आली, तर यशवंतनगर, खडकी, चिंधवली, अमृतवाडी, कुसगाव, विठ्ठलवाडी, ओहळी येथे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. एकूण नऊ ग्रामपंचायती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.

माण तालुक्यात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाने पाच ग्रामपंचायतींवर बाजी मारली असून, राष्ट्रवादीला एकच ग्रामपंचायत मिळाल्याने माण तालुक्यात पुन्हा एकदा ‘जय हो’चा नारा घुमला आहे. सत्रेवाडीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ती भाजपच्या विचारांची असून, नुकत्याच झालेल्या पाच ग्रामपंचायतींत पांगरी, दिडवाघवाडी, दोरगेवाडी, बिजवडी याठिकाणी भाजपने वर्चस्व मिळवले आहे.

बिजवडीत भाजपने स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती करत जनविकास आघाडी पॅनेल टाकले होते, तर जाधववाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला खाते उघडता आले आहे. पाटण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. मल्हारपेठ, मुंद्रुळकोळे, कुसरुंड, बेलवडे खुर्द, गावडेवाडी, जिंती ग्रामपंचायतींमध्ये देसाई गटाने सत्तांतर घडवून आणले. maharashtra Political News

तर रुवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि गाढखोपमध्ये महाविकास आघाडीने मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचा पराभव केला. आठ ग्रामपंचायतींची मंत्री देसाई यांनी तर दोन ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रीय काँग्रेसने सत्ता अबाधित राखली. मंत्री शंभूराज देसाई गटाची २० ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटणकर गटाकडे चार, काँग्रेसकडे एक ग्रामपंचायत मिळाली आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT