Pandharpur Hunger striker Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation : जरांगेंसमोर लोटांगण घालता अन्‌ आम्हाला 10 मिनिटेही देऊ शकत नाही का?; धनगर उपोषणकर्त्यांचा मंत्र्यांना सवाल

Shambhuraj desai Chandrakant patil Meet Hunger striker : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनगर आरक्षणाचा अभ्यास झाला आहे, त्यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी दीपक बोराडे यांनी केली.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 14 September : गेली सहा दिवसांपासून पंढरपूरमध्ये एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या धनगर बांधवांना भेटण्यासाठी आज सरकारचे दोन मंत्री आले होते. मात्र, चर्चेसाठी पुरेसा वेळ देत नसल्याचे पाहून त्यांनी चर्चेसाठी तुम्ही आम्हाला दहा मिनिटेसुद्धा देऊ शकत नसाल तर आमचं दुर्दैव आहे, अशी खंत उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा धनगर आरक्षणासंदर्भातील अभ्यास झालेला आहे, त्यामुळे त्यांनी आता धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावे, अशी मागणीही या वेळी मंत्र्यांसमोर करण्यात आली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे आज पंढरपूरमध्ये (Pandharpur) उपोषण करणाऱ्या धनगर बांधवांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी उपोषणकर्ते दीपक बोराडे म्हणाले, सहा दिवसांनंतर तुम्ही आमच्यासोबत चर्चेसाठी आला आहात. दहा मिनिटेसुद्धा तुम्ही चर्चेसाठी देऊ शकत नसाल, तर आमचं दुर्दैव आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर तुम्ही लोटांगण घालता. आम्ही सहा दिवस उपोषणाला बसलो आहोत, त्याबाबत साधी विचारपूस देखील करत नसाल तर आमचं दुर्दैव म्हणावं लागेल, असेही बोराडे यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनगर आरक्षणाचा अभ्यास झाला आहे, त्यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी दीपक बोराडे यांनी केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घराघरांत फोटो लावू. समाजाला जागं करण्यासाठी बलिदान देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते प्रकाश शेंडगे म्हणाले, धनगर समाज आरक्षण आंदोलन राज्यभर पुढे घेऊन जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजपवाल्यांनी आता धनगर समाजाचा अंत पाहू नये. सरकारला घरी बसवण्याची ताकद धनगर समाजामध्ये आहे. धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी माजी आमदार शेंडगे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT