Dhangar Reservation : मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ; धनगर समाजाचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

Minister Meet Hunger Strikers : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांचं बोलणं झालं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उद्या मुंबईत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. त्या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
Shambhuraj Desai-chandrakant Patil Meet Hunger Strikers
Shambhuraj Desai-chandrakant Patil Meet Hunger Strikers Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 14 September : एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पंढरपूर येथे उपोषण करणाऱ्या धनगर बांधवांची सहा दिवसांनंतर सरकारच्या दोन मंत्र्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, मंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे. धनगर समाज आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत उद्या (ता. 15 सप्टेंबर) बैठक होणार आहे. धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

दरम्यान, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांनी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय धनगर समाज (Dhangar community) बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची उपोषणकर्त्यांबरोबर चालेल्या चर्चेत ठोस तोडगा निघू शकला नाही.

शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं बोलणं झालं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उद्या मुंबईत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. त्या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षणाच्या मुद्यावर नक्कीच तोडगा काढतील.

Shambhuraj Desai-chandrakant Patil Meet Hunger Strikers
Prashant Paricharak : ‘याला उचला, त्याला उचला’ म्हणत एक दिवस हे आमदार करणाऱ्यालाही आत टाकतील’

आजच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे. मात्र, धनगर समाज बांधव उपोषणावर ठाम राहिले. त्यामुळे धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पंढरपूरमध्ये सहा दिवसानंतरही सुरूच राहिले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये उद्या दुपारी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. धनगर आणि धनगड यावर बोलणी होतील. सरकारी अधिकारीही बैठकीला येतील.

धनगर आणि धनगड ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर नक्कीच तोडगा काढतील, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला.

दम्यान, मंत्री येण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेले माढा तालुक्यातील आलेगावचे सरपंच अमोल देवकाते यांनी भाषण करत असतानाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Shambhuraj Desai-chandrakant Patil Meet Hunger Strikers
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी सरपंचाचा पंढरपूरमध्ये उपोषणस्थळी आत्महत्येचा प्रयत्न

धनगर उपोषणाला पाठिंबा देण्याचे भाषण करत असताना सरपंच अमोल देवकाते यांनी विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाज बांधवांनी अमोल देवकाते यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com