Chitra Wagh | Sanjay Rathod Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chitra Wagh : संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंमुळेच..! चित्रा वाघ म्हणाल्या, 'माझी लढाई चालूच'

Vishal Patil

Karad Political News : पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकास आघाडीत असताना मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना आता महायुतीत संजय राठोडांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राठोडांना तिकीट मिळणार असल्याने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होताना दिसत आहे. मात्र, यामध्ये संजय राठोड यांना ज्या काही गोष्टी मिळत आहेत, त्या केवळ उद्धव ठाकरेंमुळे मिळत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

कराड येथे संदेशखली प्रकरणाचा निषेध करण्यासाठी वाघ आल्या होत्या. त्यादरम्यान त्यांना माध्यमांशी बोलताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी संतप्त होत आपली भूमिका जाहीर केली.

त्या म्हणाल्या, राठोड यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणत्या बेसवर राठोडांना क्लीन चिट दिली हे कधीतरी त्यांना जाऊन विचारले पाहिजे, त्यांनी क्लीन चिट दिली नसती तर ते मंत्री झाले असते का? मात्र माझी लढाई चालूच आहे.

लोकसभेची (Loksabha Election) उमेदवारी राठोडांना मिळणार की नाही, ती कोणाला मिळणार, कोणाला तिकीट देण्यात येणार या सर्व गोष्टी जर - तरच्या आहेत. माझी मात्र लढाई चालूच आहे. माझी केस आहे, ती मी लढणार आहे.

ती केस उच्च न्यायालयात सुरू आहे. संजय राठोड हे उद्धव ठाकरेंच्या क्लीन चिटमुळे उभे आहेत. ज्या दिवशी त्यांचा शपथविधी झाला, त्या दिवशीही मी राठोडांविरोधात बोलले आहे. माझी लढाई संपलेली नाही, हे तेव्हाही बोलले मी आणि आजही बोलते आहे, असे वाघ म्हणाल्या.

संजय राठोड यांच्या विरोधात प्रचाराला जाणार?

संजय राठोड यांना लोकसभेला उमेदवारी मिळाल्यास विरोधात प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर चित्रा वाघ यांनी उत्तर देण्याचं टाळत. मला राठोड यांच्याबाबत रोज प्रश्न विचारले जात आहेत, त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करत असते, असे म्हणत राठोड ज्या ठिकाणी आहेत ते तिथे केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे आहेत, असे त्या म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मणिपूरच्या घटनेत विरोधक पळून गेले...

मणिपूरच्या घटनेत आम्ही व्यक्त झालो आहोत. अमित शाहांनी पूर्णपणे भूमिका मांडत विरोधी पक्षांना चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र, विरोधक चर्चा न करता पळून गेले. राजस्थान, पश्चिम बंगाल येथे झालेल्या घटनांचा उल्लेख करत भाजपविरोधी सरकारवर चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला. परंतु, मणिपूरच्या घटनेत भाजपच्या महिला आघाडी किंवा चित्रा वाघ यांनी काय केले याचे उत्तर देणे टाळल्याचे दिसले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT