CM Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांनी मारला नातवासमवेत शेतात फेरफटका ; चाखली स्ट्रॉबेरीची गोडी...

Field trip with grandchildren : उतेश्वरच्या यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंदिरात लावली हजेरी.

Amol Sutar

- उमेश भांबरे

CM Eknath Shinde News : एकीकडे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहताना दुसरीकडे यात्रेनिमित गावी आल्यावर कुटुंब प्रमुखाची ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पार पाडताना दिसत आहेत. आज सकाळी आपल्या नातवासमवेत इलेक्ट्रिक गाडीतून फेरफटका मारला. तसेच स्ट्रॉबेरीच्या शेतातील फळेही खाल्ली.

त्यानंतर ते उत्तेश्वराच्या यात्रेनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या आपल्या मुळगावी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहताना दुसरीकडे यात्रेनिमित गावी आल्यावर कुटुंब प्रमुखाची ही भूमिका ते पार पाडताना दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सकाळी आपल्या नातवासमवेत इलेक्ट्रिक गाडीतून फेरफटका मारला. तसेच स्ट्रॉबेरीच्या शेतातील फळेही खाल्ली. त्यानंतर ते उत्तेश्वराच्या यात्रेनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. दरम्यान, काल (बुधवारी) रात्री त्यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठी जिल्हाभरातून मोठ्यासंख्येने नागरीक, महिला, विविध संघटनांचे पदाधिकारी दरे येथे आले होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. समस्या घेऊन आलेल्या नागरीकांची या जनता दरबारात मोठी रांग लागली होती.

दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक गाडीतून नातवाला मांडीवर घेऊन शेतात फेरफटका मारला. तसेच दोघांनी स्ट्रॉबेरीही खाल्ली. त्यानंतर ते उतेश्वरच्या यात्रेनिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंदीराकडे रवाना झाले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT