Shivsena-Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha Constituency : सांगलीचा तिढा सुटेना... काँग्रेस-शिवसेनेचा दावा कायम!

Mahavikas Aghadi : सांगलीतून शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. मात्र, काँग्रेसनेही सांगलीची जागा शिवसेनेला देण्यास तीव्र विरोध केला आहे. माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश नेत्यांकडे सांगलीची जागा सोडू नये, अशी मागणी केली आहे.

Anil Kadam

Sangli News : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्याप तोडगा निघालेला नाही. ही जागा काँग्रेसला शुक्रवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पुन्हा शनिवारी सांगलीची जागा सेनेचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) वाद रंगला आहे. दरम्यान, जागा वाटपावर रविवारी रात्री पुन्हा बैठक होणार आहे, त्यामध्ये सांगलीच्या जागेचा निर्णय होईल, अशी आशा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना आहे.

गेल्या आठ दिवसांत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) केवळ जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. पण, जागा जाहीर करण्यामध्ये अद्याप नेत्यांना यश आलेले नाही. कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून (Congress) लढणार असल्याचे नक्की झाले आहे. शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आघाडीतील सांगली, हातकणंगले या जागा सोडण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेने कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडली आहे. त्या बदल्यात त्यांनी सांगलीवर दावा केला आहे.

सांगलीतून शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. मात्र, काँग्रेसनेही सांगलीची जागा शिवसेनेला देण्यास तीव्र विरोध केला आहे. माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश नेत्यांकडे सांगलीची जागा सोडू नये, अशी मागणी केली आहे.

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगली आपणच लढवणार असल्याची ग्वाही दिली आहे. मात्र, शिवसेनेनेही आपला आग्रह कायम ठेवला. सांगलीची जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसच्या केंद्रीय समितीने शिवसेनेला सांगितले. त्यामुळे सांगली काँग्रेस लढणार असल्याचे नक्की होत असतानाच शनिवारी खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आम्ही कोल्हापूर काँग्रेससाठी सोडल्याने सांगलीवर आमचा दावा कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे सांगलीबाबत आणखी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची रविवारी मुंबईत सभा आहे. या सभेनंतर जागा वाटपावर पुन्हा खल होणार आहे. त्यामध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT