Madha Lok Sabha Constituency : पवारांची माढ्यासाठी मोठी खेळी; मोहिते पाटलांच्या निकटवर्तीय बड्या नेत्याला 'निरोप'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांच्या घरी भेट देण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी ही भेट होऊ शकली नाही.
Baliram Sathe Meet Narayan Patil
Baliram Sathe Meet Narayan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माढा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील गटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होताना दिसत आहे. त्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्फत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना माढ्यासाठी निरोप पोचविला आहे. विशेष म्हणजे नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. आता नारायण पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रवक्ते महेश माने, मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे यांनी जेऊर (ता. करमाळा) येथे माजी आमदार पाटील यांची भेट घेतली. यापूर्वीही माढ्यातून इच्छुक असलेले अभय जगताप यांनीही नारायण पाटील यांची भेट घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baliram Sathe Meet Narayan Patil
Sanjaykaka Patil : केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या संजयकाका पाटलांना यंदा भाजपतूनच विरोध....

माजी आमदार नारायण पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, अशी मागणी होत आहे. त्यातच शुक्रवारी (ता. १५ मार्च) जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आणि पवारसाहेबांनी तुमची भेट घ्यायला पाठवले आहे, असा निरोप दिला.

या वेळी मकाईचे माजी अध्यक्ष तथा पवारांचे विश्वासू कार्यकर्ते आप्पासाहेब झांजुर्णे यांनी नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांच्या घरी भेट देण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी ही भेट होऊ शकली नव्हती.

Baliram Sathe Meet Narayan Patil
Solapur Politics : सोलापुरातील दोन पराभवांचा वचपा काढण्याच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसला धक्का; तालुकाध्यक्षांचा राजीनामा

तेव्हापासून नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा, यासाठी पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करत आहेत. मात्र, नारायण पाटील यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मागील आठवड्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही जेऊर येथे जाऊन नारायण पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तुतारी हाती घ्यावी, या मागणीचा जोर वाढत आहे. त्यातच पक्षाच्या प्रमुखांचा निरोप घेऊन जेऊरमध्ये जिल्हाध्यक्ष गेल्याने भविष्यात नारायण पाटील नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baliram Sathe Meet Narayan Patil
Election Commission PC : सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत ठेवल्या? निवडणूक आयुक्तांचे सडेतोड उत्तर...

नारायण पाटलांनाच विचारणा का?

दरम्यान, मोहिते पाटील हे निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे कमालीचे दुखावले आहेत. त्यांना माढ्यातून तिकिट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पवारांकडून होताना दिसत आहे. माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच, मतदारसंघातील धनगर मतांचा विचार करता नारायण पाटील यांची उमेदवारी फायदेशीर ठरू शकते, त्यातूनच पवारांकडून नारायण पाटील यांच्याकडे विचारणा होताना दिसत आहे.

Baliram Sathe Meet Narayan Patil
Electrol Bond Post : इलेक्ट्रोल बाँडची 'ती' पोस्ट भाजपला झोंबली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला कायदेशीर कारवाईचा इशारा

पवारांचा निरोप मिळाला; कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार : नारायण पाटील

बळीराम साठे यांच्या भेटीबाबत नारायण पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही माझ्याशी संपर्क साधला होता. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांकडून मला राष्ट्रवादीत येण्यासंदर्भात कायम विचारणा होत आहे. माझ्याकडे शुक्रवारी बळीराम साठे, प्रवक्ते महेश माने, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब झांजुर्णे आले होते. त्यांनी शरद पवार यांचा निरोप मला दिला आहे. याबाबत काय निर्णय घ्यायचा, हे माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवणार आहे.

Baliram Sathe Meet Narayan Patil
Girish Mahajan Solapur Tour : दोन वेळा जिंकलेले सोलापूर भाजपच्या ‘संकटमोचका’ने रातोरात का गाठले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com