Parbhani Loksabha News : आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांच्या गळ्यातही भगवा; पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आले एकत्र..

Loksabha Election 2024: संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही भगवा रुमालही न वापरलेल्या काँग्रेस नेत्यांच्या गळ्यातील भगवा रुमाल उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
Parbhani Loksabha News
Parbhani Loksabha News Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : शिवसैनिकांची ताकद म्हणजे भगवा उपरणं. हे भगवे उपरणं एकदा गळ्यात परिधान केला की शिवसैनिकांच्या अंगात हत्तीचे बळ येते. त्यामुळे प्रत्येक आंदोलनात, सभेत, बैठकात भगवे उपरणं घातलेल्या शिवसैनिकांचा एक वेगळाच दरारा दिसून येतो. शिवसैनिकांसाठी आभूषण असणाऱ्या या भगव्या उपरण्यापासून इतर पक्षीय नेते मात्र सदैव चार हात लांबच असायचे.

परभणीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मात्र काँग्रेसच्या नेत्यांनाही गळ्यात भगवा उपरणं घालावेच लागला. परभणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख हे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे कट्टर समर्थक. त्यांनी अनेक वर्षे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद भूषविले. तसेच परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले.

Parbhani Loksabha News
Sachin Pilot News : सचिन पायलटांनी उद्घाटन केलेले 'ते' स्मारक दुसऱ्या दिवसापासून अंधारात...

परभणी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा बोलावला होता. या मेळाव्यात सुरेश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजकांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करताना त्यांच्या गळ्यात भगवे उपरणे घातले. संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही भगवा रुमाल वापरलेल्या काँग्रेस नेत्यांच्या गळ्यातील भगवे उपरणे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक एकत्र

माजी खासदार तुकाराम रेंगे हे मुळात शिवसैनिक होते. मात्र, पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) सरकारच्या काळात अणुकराराप्रसंगी तुकाराम रेंगे यांनी काँग्रेस सरकारला साथ दिली व अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या निर्णयाला समर्थन देत तुकाराम रेंगे हे सुद्धा भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र महाविकास आघाडीच्या मेळाव्यात हजेरी लावून त्यांनी काँग्रेस पक्षात असल्याचा संदेश दिला आहे. 

विद्यमान खासदार संजय जाधव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच परभणी विधानसभा मतदारसंघाचे  आमदार म्हणूनही  काम केले आहे. त्यामुळे तुकाराम रेंगे शिवसेनेत असताना त्यांनी संजय जाधव यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. परंतु रेंगे यांनी शिवसेना सोडल्याने संजय जाधव व रेंगे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले तुकाराम रेंगे भगवा रुमाल परिधान करून व्यासपीठावर उपस्थित होते

Parbhani Loksabha News
Sachin Pilot News : सचिन पायलटांनी उद्घाटन केलेले 'ते' स्मारक दुसऱ्या दिवसापासून अंधारात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com