Solapur Politics : सोलापुरातील दोन पराभवांचा वचपा काढण्याच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसला धक्का; तालुकाध्यक्षांचा राजीनामा

Pandharpur Taluka Congress president Resign : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींकडून मला विश्वासात घेतले जात नाही. प्रोटोकॉल न पाळता आम्हाला तालुकाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या कामात विश्वासात घेतले जात नसल्यामुळे मी पंढरपूर तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, तो राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी मोरे यांनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी कामाला लागलेल्या काँग्रेस पक्षापुढील आव्हानांचा डोंगर काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे निवडणुकीचा बिगुल वाजत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, हे उद्दिष्ट ठेवूनच काँग्रेस पक्षाने (COngress) गेल्या सहा महिन्यांपासून तयारी चालवली आहे. मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
Election Commission PC : सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत ठेवल्या? निवडणूक आयुक्तांचे सडेतोड उत्तर...

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे या गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत आहेत. एकीकडे प्रणिती शिंदे या नव्या जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्या तरी त्यांना जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. मंगळवेढा तालुक्यात गेलेल्या प्रणिती शिंदे यांना शेतकऱ्यांनी पाणीप्रश्नावर धारेवर धरले होते. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी आपण काय केले, असा सवाल शेतकऱ्यांनी त्यांना विचारला होता.

पाण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले असताना दुसरीकडे मराठा समाजही आरक्षणाच्या प्रश्नावरून आमदार-खासदारांना जाब विचारत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या गाठीभेटी घेणाऱ्या प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावरून कोंडीत पकडले होते. शेतकरी आणि मराठा समाजाकडून कोंडी होत असताना दुसरीकडे पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस हैराण झाली आहे.

Congress
Electrol Bond Post : इलेक्ट्रोल बाँडची 'ती' पोस्ट भाजपला झोंबली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला कायदेशीर कारवाईचा इशारा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील या मारहाण प्रकरणामुळे जामीन मिळत नसल्याने गायब आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्याध्यक्ष नेमण्यात आला आहे. जिल्हाध्यक्षांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत असतानाच ‘आपल्याला पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात येते. कार्यक्रमाची आपल्याला माहिती देण्यात येत नाही’ असे सांगून काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींकडून मला विश्वासात घेतले जात नाही. प्रोटोकॉल न पाळता आम्हाला तालुकाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या कामात विश्वासात घेतले जात नसल्यामुळे मी पंढरपूर तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, तो राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी मोरे यांनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे.

R

Congress
Girish Mahajan Solapur Tour : दोन वेळा जिंकलेले सोलापूर भाजपच्या ‘संकटमोचका’ने रातोरात का गाठले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com