Nitesh Rane-T. Raja Shinh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : नीतेश राणे, टी. राजा यांना ‘सोलापूर प्रवेशबंदी’ करा; पोलिस आयुक्तांना निवेदन

Vijaykumar Dudhale

Solapur News : हिंदू आक्रोश मोर्चामध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे आणि तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांच्यावर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झाला. आता त्यांना सोलापुरात प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Demand to ban entry of Nitesh Rane, T Raja to Solapur)

अल्पसंख्याक हक्क परिषद, जातीअंत संषर्घ समिती, डेमॉक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया, कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि युसूफ मेजर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना भेटून निवेदन दिले. त्या निवेदनाद्वारे आमदार नीतेश राणे आणि टी राजा यांना सोलापुरात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी नगरसेविका कलबुर्गी म्हणाल्या की, तरुण मुलं भडकलेली आहेत. त्यांना समजावून सांगणारे पाहिजेत. याउलट काही लोक या तरुणांची डोकी भडकाविण्यासाठी सोलापुरात येत आहेत. त्याचा त्रास आपल्या सर्वांना होतो. हे करणारे करून जातात. पण, त्याचा त्रास गरिबांना आणि पोलिसांना होतो. कारण, पोलिसांची संख्या कमी आहे, त्याही परिस्थितीत ते आपल्या सर्वांचे संरक्षण करीत आहेत, हे मोठे काम आहे.

परवा आलेल्या दोन आमदारांनी केलेल्या भाषणामुळे सोलापूर शहराची शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, पोलिसांनी दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी तातडीने त्यांचा बंदोबस्त केला. भविष्यकाळात या दोन आमदारांना म्हणजे नीतेश राणे आणि टी. राजा सिंह यांना, तसेच जातीय तेढ निर्माण करणारे आमदार, खासदार किंवा मंत्री यांना शहर प्रवेशाला बंदी घातली पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी युसूफ मेजर यांनी केली.

ते म्हणाले की, भविष्यात सोलापूर शहरात शांतता राहण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या माणसांना सोलापुरात प्रवेशबंदी केली पाहिजे. याबाबतचे निवदेन आम्ही सोलापूर पोलिस आयुक्तांना दिले आहे. ‘भविष्यात असे मोर्चे आणि आंदोलन करणाऱ्यांना परवानगी द्यावी की देऊ नये, याबाबतचा आमचा विचार चालू आहे,’ असे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

सोलापुरात जातीय आणि धार्मिक वाद पेटविण्याचा प्रयत्न चालला आहे. तो आपण सर्वांनी रोखला पाहिजे. जातीयवादाच्या माध्यमातून कोणी राष्ट्रीय एकात्मतेला नख लावण्याचे काम करीत असेल तर संबंधिताला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची तयारी यंत्रणेने केली पाहिजे. प्रशासनाला जनतेनेही सहकार्य केले पाहिजे, अशी मागणी अतुल वासम यांनी केली आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT