Malhar Patil-Dhananjay Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dharashiv Politic's : तानाजी सावंतांचा पुतण्या कट्टर विरोधकासोबत : मल्हार पाटलांसोबतचे फोटो व्हायरल; अध्यक्षपदासाठी अर्चना पाटलांचे पारडे जड

Zilla Parishad President : धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने धाराशिव झेडपी राजकारणात मोठा ट्विस्ट आला. मल्हार पाटील यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या शक्यता बळावल्या.

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv, 17 February : धाराशिव जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि धनंजय सावंत यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. सावंतांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अर्चना पाटील यांचे अध्यक्षपदाचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या (Dharashiv ZP) ५५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १९, तर शिवसेनेने १५, राष्ट्रवादी काँग्रेसने ०६, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ०७, अपक्ष ४, काँग्रेस ३ आणि समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, निकालानंतर भाजपने बहुमताचा दावा केला आहे. मात्र, शिंदेसेना इथे राणा पाटील यांच्यासोबत एकत्र यायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरही भाजपने बहुमताचा दावा केला आहे.

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी धाराशिवमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय सावंत यांनी निवडणुकीत काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड करत झेडपीची निवडवणूक लढवली होती. त्या वेळी भाजपचे आमदार डॉ. सूरजितसिंह ठाकूर यांनी सावंत यांना पाठबळ दिले होते, त्यामुळे धनंजय सावंत हे भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, ते आज सिद्ध झाले आहे.

दरम्यान, तानाजी सावंतांचे पुतणे आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यात मैत्री आहे. ती मैत्रीच आता जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी राणा पाटील यांच्या मदतीला आल्याचे मानले जात आहे. सावंतांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भाजपचे विशेषतः अर्चना पाटील यांचे अध्यक्षपदासाठीचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषदेत भाजपला विक्रमी बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय सावंत यांनी यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यावेळीही त्यांना जिल्हा परिषदेत एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवा नेते मल्हार पाटील आणि धनंजय सावंत यांच्या भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपला मिळणारे समर्थन पाहता अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे. आता विरोधी पक्षाकडून भाजपच्या खेळीला कसे उत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT