BJP Politic's : भाजपने डाव साधला; शिवसेनेला गाफील ठेवत राष्ट्रवादीला लावले गळाला...

Solapur Corporation Politic's : सोलापूर महापालिकेत भाजपने ८७ जागांसह ऐतिहासिक विजय मिळविला. स्वीकृत नगरसेवक निवडीपूर्वी राष्ट्रवादीसोबत आघाडी नोंदवत भाजपने वेगवान राजकीय खेळी करत स्थानिक सत्ता समीकरणात निर्णायक आघाडी घेतली.
Solapur Corporation
Solapur CorporationSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 February : सोलापूर महापालिकेत तब्बल ८७ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आहे. ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपने स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीसाठी वेगवान खेळी करत अधिकची एक जागा पदरात पाडून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या हाती लागण्याआधीच पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन पुण्यात भाजप-राष्ट्रवादी आघाडीची नोंदणीही केली, त्यामुळे गोरे, कोठे आणि काळे या त्रयींनी काँग्रेसचे चेतन नरोटे, शिवसेनेचे अमोल शिंदे यांना धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या १०२ जागा असून १० नगरसेवक स्वीकृत म्हणून नेमता येणार आहेत. त्या हिशेबाने भाजपच्या वाट्याला आठ जागा आल्या असत्या, तर एमआयएमच्या आठ जागा असून त्यांना एक, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीला एक जागा मिळाली असतील. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युतीची चर्चाही झाली होती. मात्र, त्या अगोदरच भाजपने डाव साधला.

आता भाजपला (BJP) एकूण ९ स्वीकृत सदस्य नेमता येणार आहेत. कारण राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही हिरवा कंदिल दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबदल्यात राष्ट्रवादीला विकास निधी देण्याचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

भाजपच्या नव्या खेळीने काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीला एकही स्वीकृत नगरसेवक घेता येणार नसल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादीला गळाला लावत भाजपने शिवसेना आणि काँग्रेसला महापालिकेत एकही फायद्याची गोष्ट होऊ द्यायची नाही, असे ठरविल्याचे दिसून येते. मात्र या खेळीमुळे भाजपचे स्वीकृतचे नऊ आणि निवडून आलेले ८७ असे एकूण ९६ नगरसेवक होणार आहेत.

Solapur Corporation
Satara ZP : साताऱ्यात भाजपचा ‘ऑपरेशन लोटस’चा मोठा डाव; राष्ट्रवादीचे ZP सदस्य अज्ञातस्थळी, शिवसेनाही अलर्ट मोडवर

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीच्या संदर्भात बैठकही झाली होती. मात्र, ह्या युतीमुळे भाजपचा स्वीकृत नगरसेवक एक कमी होणार आहे, हे चाणाक्ष असलेले सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या लक्षात आले. त्याबाबत महापौर कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी चर्चा केली. या तिघांनी मिळून मुक्कामी असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास परवानगी दिली.

त्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांना सोबत घेऊन पुणे गाठले, त्या ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी आघाडीची नोंदणी केली, त्यामुळे भाजपने शिवसेना-काँग्रेसचा डाव हाणून पाडत पालिकेतील संख्यबळ एकने वाढविले आहे. या नोंदणीपूर्वी भाजपचे संख्याबळ ८.५२ होते. मात्र राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने ते ८.६८ झाले आहे. एमआयएमचे ८ नगरसेवक असून ८ X १० केले तर ८० होतात, त्याला एकूण सदस्यसंख्या १०२ ने भागले असता ०. ७८ असा अपूर्णांक येतो.

Solapur Corporation
Nitesh Rane : ठाकरेंना डिवचणाऱ्या नितेश राणेंची मागणी भाजप महापौर मान्य करणार का? पत्र धाडत म्हणाले...

काँग्रेस २, शिवसेना २ युतीचे सहा सदस्य असून राष्ट्रवादीचा एक नगरसेवक काँग्रेस-शिवसेनेसोबत असता तर त्यांची संख्या ७ झाली असती. त्यानुसार ७ X १० भागले १०२ केले तर ०.६८ झाले असते, तर भाजपची ८७ सदस्य संख्येनुसार ८.५२ झाले असते. त्यामुळे ०. ६८ हा अपूर्णांक हा भाजपच्या ०.५२ पेक्षा मोठा ठरला असता आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीला एक स्वीकृत नगरसेवक द्यावा लागला असता, तो भाजपने आपल्या पदरात पाडून घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com