Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांच्या टायमिंगची चर्चा; भाजप, गोरेंसोबत तणाव वाढताच ठाण्यात घेतली एकनाथ शिंदेंची भेट

Dhairyasheel Mohite Patil meet Eknath Shinde : धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. भाजपचे झेडपी यश, जयकुमार गोरेंची निधीवरील विधाने आणि बदलते सत्ता समीकरण यामुळे तर्कवितर्क वाढले.
Eknath Shinde- Dhairyasheel Mohite Patil
Eknath Shinde- Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 February : भारतीय जनता पक्षाच्या बलाढ्य सत्तेशी विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्यांशी दोन हात करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मिळविलेले यश, निधीसंदर्भात गोरेंनी केलेली विधाने आणि मोहिते पाटील यांचे एकनाथ शिंदेंना भेटणे, यामुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची ठाणे येथे जाऊन भेट घेतली, असे या भेटीमागचे कारण मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी साधलेल्या टायमिंगची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली होती. त्यादृष्टीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या वेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात होती. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अजितदादांचा पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना विकास निधीसाठी आधार होता. पण दादांच्या अपघातील मृत्यूमुळे सगळी समीकरणेच बदलली आहेत.

लोकसभा निवडणुकीपासून धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका, जिल्हा परिषदेत निवडणुकीतही भाजप विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांना इशारे-प्रतिइशारे दिले आहेत. पालकमंत्री गोरे यांनीही निधीसाठी भाजपकडेच यावे लागणार आहे, अशा आशयाची विधाने केली आहेत. त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Eknath Shinde- Dhairyasheel Mohite Patil
BJP Politic's : भाजपने डाव साधला; शिवसेनेला गाफील ठेवत राष्ट्रवादीला लावले गळाला...

त्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी ठाण्यात जाऊन भेट घेणे, विशेष मानले जात आहे. विकास कामांमध्ये भाजपकडून होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन मोहिते पाटील यांनी शिंदेंकडे पर्यायी व्यवस्था केली ही काय, अशीही चर्चा रंगली आहे.

Eknath Shinde- Dhairyasheel Mohite Patil
Kolhapur News : कोल्हापूर मनपात मोठा उलटफेर! पराभूत उमेदवाराची लागली 'लॉटरी', स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित!, कोण आहेत ते नशीबवान 8 चेहरे?

भारतीय जनता पक्षासोबत विशेषतः पालकमंत्री गोरेंशी वाढत जाणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीचे साधलेले टायमिंग विशेष मानले जात आहे. या भेटीचे सोलापूरच्या राजकारणात काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांचे सहकारी आमदार उत्तम जानकर यांनीही यापूर्वी शिंदेंचे जाहीर कौतुक केले आहे, त्यामुळे माळशिसरच्या मोहिते पाटील आणि शिंदे कनेक्शनची जोरात चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com