

ZP Election Result News : धाराशीव जिल्हा परिषदेत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हेच दादा ठरले आहेत. सर्वाधिक जागा जिंकत त्यांनी भाजपला मोठा भाऊ तर केलेचं, पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या हाती जिल्ह्याची सुत्रं जाण्यापासूनही थांबवले. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील या जोडीचा प्रभाव ओसरल्याचे दिसून आले. धाराशीवमध्ये महायुतीची सत्ता आणि अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 55 पैकी 19 जागा जिंकत जिल्ह्यात आपणच मोठे भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणुकीत भाजपचे आमदार राणा जगजीतसिंग पाटील, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आरोग्य मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. भाजपच्या खालोखाल 15 जागा जिंकत आमदार तानाजी सावंत यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
पुतण्या धनंजय सावंत विजयी झाल्यामुळे तानाजी सावंत यांना धक्का बसला असला तरी जिल्ह्यात मिळालेल्या यशामुळे तो पचवण्यासारखा आहे. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम राजेनिंबाळकर विरुद्ध भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असा संघर्ष पाहायला मिळाला. निवडणुकीआधीच राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी ओम राजेनिंबाळकर यांना आव्हान दिले होते.
निवडणूक प्रचारातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. पाटील विरुद्ध ओम राजेनिंबाळकर या संघर्षात राणा पाटील आणि मल्हार पाटील या पिता पुत्रांची सरशी झाली. ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या 7 जागा जिंकत काही प्रमाणात ताकद दाखवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 जागांवर यश मिळवता आले तर काँग्रेस पक्ष 3 जागांवर अडकला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धाराशिव मध्ये खातेही उघडता आलेली नाही.
तेर जिल्हा परिषद गटातून या पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांचा भाजपच्या अर्चना पाटील यांनी पराभव केला. खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यावर त्यांनी भाऊबंदकी जपली असे म्हणत अर्चना पाटील यांच्या विजयासाठी हातभार लावल्याचा गंभीर आरोप केला. तर ओम राजेनिंबाळकर यांनी आपल्याकडे फुकटचे दामोजीराव म्हणजेच पैसे नसल्यामुळे आपला नगरपालिका, नगरपंचायतीत पराभव झाल्याचे म्हटले होते. जिल्हा परिषदेतील पराभवावरही त्यांचे हेच उत्तर असणार आहे. 5 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली असली तरी महायुतीला त्यांची गरज भासणार नाही असा हा निकाल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.