Eknath Shinde-Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajesh Kshirsagar : अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा हवाला देत राजेश क्षीरसागरांनी मंत्रिपदाबाबत केला मोठा दावा

Kolhapur Shivsena News : मी कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी व शिवसैनिक असल्याने मला योग्य ती जबाबदारी दिली जाईल, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.

Rahul Gadkar

Kolhapur, 16 December : कोल्हापुरात शिवसेनेकडून राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार प्रकाश अबिटकर यांना संधी मिळणार की राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना संधी मिळणार? याचे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्यानंतर क्षीरसागर यांनी त्याचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरून कौतुक करताना, अडीच-अडीच वर्षाचे मंत्रिपद असा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याने पुढच्या अडीच वर्षांत नक्कीच मला मंत्री बनवून चांगले खाते दिले जाईल, असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.

राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हणाले, गेल्या दोन-अडीच वर्षात घडलेल्या घडामोडी पाहता शिवसेनेसोबत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना दिले गेलेले शब्द पूर्ण करणे, ही आमची जबाबदारी मानतो. त्यामुळे मोठेपणा दाखवीत या निवडीस मान्यता दिली. 2019 ला पराभव झाल्यानंतरही आजतागायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाच्या दर्जाचे पद मला कायम ठेवले आहे.

मंत्री दर्जा पदाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी देवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास करण्याची संधी दिली आहे. मंत्रिपद असल्यावरच राज्याचा व जिल्ह्याचा विकास साध्य करता येते असे नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी व शिवसैनिक असल्याने मला योग्य ती जबाबदारी दिली जाईल, असे क्षीरसागर म्हणाले.

ते म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे नाराजीचे कोणतेही कारण नाही. शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांना दिलेला शब्द पाळला आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत, निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करू. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एक खासदार आणि चार आमदार असल्याने ‘पालकमंत्री’ पद शिवसेनेस द्यावे, अशी मागणीही राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT