Modi Solapur Visit Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Modi Solapur Visit : मोदींच्या दौऱ्यासाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त; सभास्थळी एक तास आधी पोहोचा!

Ray Nagar News : नागरिकांना सभास्थळी सकाळी साडेसातपासून साडेनऊपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कुंभारी येथे दाखल होणार आहेत. मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापूर्वी एक तास अगोदर कार्यक्रमाला येणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांना सभास्थळी सकाळी साडेसातपासून साडेनऊपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे. (Five thousand policemen will be deployed for Prime Minister Narendra Modi's visit to Solapur)

कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतून सोलापूरमधील कुंभारीच्या रे-नगर येथे असंघटित कामगारांसाठी वसाहत उभारण्यात आली आहे. येथील १५ हजार घरांचे उद्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मोदी यांच्या हस्ते पाच कामगारांना प्रातिनिधीक स्वरूपात घराच्या चाव्या देऊन या वसाहतीचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोदी यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी यांच्या दौऱ्यासाठी सोलापूर ग्रामीण, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा, पिंपरी-चिंचवड आणि नगर या ठिकाणाहून पोलिस बंदोबस्त मागून घेतला आहे. मोदी यांच्या दौऱ्यासाठी जवळपास पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. हे सर्व पोलिस कार्यक्रमाच्या ठिकाणापासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरापर्यंत बंदोबस्तासाठी असणार आहेत. पोलिस उपाधीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आदी 290 अधिकारी आणि सुमारे साडेतीन हजार पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्तामध्ये समावेश असाणर आहे.

रोड शो होणार नाही

मोदी यांच्या दौऱ्यासाठी रे-नगर येथे सहा हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. त्यातील दोन हेलिपॅड हे मोदी यांच्यासाठी राखीव असणार आहेत, या हेलिपॅडची चाचणी प्रशासनाने बुधवारी यशस्वीपणे घेतली आहे. दरम्यान, मोदी यांचा होटगी रोड ते रे-नगर असा रोड शो होणार असल्याची चर्चा होती. मात्र, तो रोड शो होणार नसल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.

मोदी येण्यापूर्वी एक तास आधी कार्यक्रमस्थळी पोहोचा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमस्थळी साडेदहाच्या सुमारास आगमन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेसातपासूनच नागरिकांना सभास्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. मोदी कार्यक्रमस्थळी येण्याच्या एक तास अगोदरच नागरिकांनी जागेवर स्थानापन्न होणे आवश्यक आहे. त्यामुळे मोदी हे सभास्थळी येण्याच्या एक तास अगोदर उपस्थित असणे बंधनकारक आहे.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT