Modi Solapur Tour : मोदींच्या दौऱ्यासाठी सोलापुरात सहा हेलिपॅड; बावनकुळेंच्या हेलिकॉप्टरद्वारे यशस्वी चाचणी

Solapur Re Nagar Home Project News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारपासून सोलापुरात ठाण मांडून आहेत.
Narendra Modi Solapur Tour
Narendra Modi Solapur TourSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सोलापुरात असंघटीत कामगारांना घरांचे वाटप होणार आहे. त्यासाठी मोदी हे उद्या सकाळी सोलापूरमधील कुंभारीच्या रे नगर येथे येत आहेत. त्यासाठी रे नगर येथे सहा हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत, त्यातील दोन हेलिपॅड हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी राखीव असणार आहेत. त्याची चाचणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हेलिकॉप्टर उतरवून यशस्वीपणे घेण्यात आली. (Six helipads in Solapur for PM Narenda Modi's visit)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतून कुंभारी येथील रे नगर येथे असंघटीत कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील १५ हजार घरे बांधून तयार झाली असून त्याचे लोकार्पण उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पाच लाभार्थींना मोदी यांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi Solapur Tour
Kolhapur Politics : सतेज पाटलांची निवडणूक स्ट्रॅटेजी विरोधकांना करणार घायाळ; सोशल मीडिया ठरणार ब्रह्मास्त्र

मोदी यांच्या सोबत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सोलापुरात येत आहेत. मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यासाठी एकूण सहा हेलिपॅड बनविण्यात आले आहेत. त्यातील दोन हेलिपॅड हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी राखीव असणार आहेत. त्या हेलिपॅडची यशस्वी चाचणी प्रशासनाने केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हेलिकॉप्टर उतरवून मोदी यांच्या दोन्ही हेलिपॅडची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

रे नगर येथील सहा हेलिपॅडपैकी एका हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर दुसऱ्या हेलिपॅडवर राज्यपाल रमेश बैस, तिसऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चौथ्यावर अजित पवार यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात येणार आहे. उर्वरीत दोन हेलिपॅड ही मोदींसाठी राखीव असणार आहेत. या प्रकल्पाचे संकल्पक माजी आमदार नरसय्या आडम यांनी ही माहिती दिली आहे.

Narendra Modi Solapur Tour
Ajit Pawar CM News : ‘एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा’; राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात घुमला नारा

मोदी यांच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे लोकार्पण होणार आहे. तसेच, रे नगर येथे ४० अंगणवाड्या आणि इतर सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. पाचशे लोकांना ट्रेनिंग देणारे कौशल्य विकास केंद्रेही उभारण्यात आली आहेत. त्याचेही उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Narendra Modi Solapur Tour
Shivsena News : शिवसेनेची घोषणाबाजी, ठाकरे गटाचा संयम तरीही शाब्दिक चकमक

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारपासून सोलापुरात ठाण मांडून आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन ते स्वतः पाहत आहेत. ते शुक्रवारपर्यंत सोलापुरातच असणार आहेत. याशिवाय पंतप्रधान कार्यालयात अधिकारीही मोदी यांच्या दौऱ्यातील नियोजनाचे काम पाहत आहेत.

Narendra Modi Solapur Tour
RAY Nagar: शरद पवार, फडणवीसांनी शब्द पाळला; आडम मास्तरांच्या 13 वर्षांच्या संघर्षाला यश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com