Karad, 06 April : संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील एक ते पन्नास टेबलावर मतमोजणीत बाळासाहेब पाटील यांचे पॅनेल तब्बल एक ते दीड हजार मतांनी पुढे आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या (Sahyadri Sugar factory) मतमोजणीत हाच ट्रेंड कायम राहिला तर बाळासाहेब पाटील यांची तब्बल 25 वर्षांपासून सत्ता कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. मतमोजणीचा हा पहिला टप्पा सुरू आहे, त्या पहिल्या टप्प्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने जोरदार ओपनिंग केल्याचे दिसून येत आहे.
कऱ्हाड (Karad)तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 05 एप्रिल) 81.7 टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला आज (रविवारी, ता. 06 एप्रिल) सकाळपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एक ते पन्नास टेबलवर मतपत्रिका गटनिहाय वेगवेगळ्या करून मतमोजणी करण्यात येत आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे व ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या तीन पॅनेलमध्ये थेट लढत झाली. बाळासाहेब पाटील यांना कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढा कडवा विरोध झाला आहे.
सह्याद्री कारखान्याची निवडणूक तब्बल 25 वर्षानंतर होत असून त्यात कमालीची चुरस निर्माण झालेली आहे. सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, कडेगाव या तालुक्यांतील 99 केंद्रांवर शनिवारी मतदान झाले होते. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26 हजार 109 मतदारांनी मतदान केले होते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.