Bharat Patankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patankar Warning To Govt : भारत पाटणकर ‘टेंभू’वरून आक्रमक; निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

Tembhu Water Issue : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी टेंभू योजनेच्या उर्वरित कामांना निधी देण्यात यावा

Anil Kadam

Sangli News : पहाटेचा शपथविधी व प्रवेश सोहळा घेण्यासाठी सरकारकडे वेळ आहे. मात्र, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यास वेळ नाही. राज्य सरकारने दुष्काळी भागातील जनतेला विश्वासात घेऊन लवकर निधी मंजूर करावा; अन्यथा आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. सरकारी धोरणांचाही त्यांनी निषेध केला. (Tembhu scheme)

लिंगीवरे येथे आटपाडी तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. भारत पाटणकर बोलत होते. या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते आनंदराव पाटील, साहेबराव चवरे, जनार्दन झिंबल, विजयसिंह पाटील, महादेव देशमुख, मनोहर विभूते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 12 गावांचा समावेश 2019 मध्येच या योजनेत झाला आहे. सुप्रमा जरी आता मंजूर झाली असली तरी सध्या त्या कामाला निधी मिळणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. पाच हजार घनमीटर प्रत्येक कुटुंबाला पाणी देणार आहे. राज्य सरकारकडे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, परंतु सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देत असल्याचे दिसून येते. (Sangli Marathi News)

टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांच्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निधी देऊन तत्काळ कामे सुरू करावीत. वर्षानुवर्षी दुष्काळी आटपाडीला पाण्याच्या लढ्यानंतर टेंभू योजनेचे पाणी मिळाले. काही गावे अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी टेंभू योजनेच्या उर्वरित कामांना निधी देण्यात यावा; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू. तसेच, विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा डॉ. पाटणकर यांनी दिला.

आनंदराव पाटील म्हणाले, चळवळीच्या रेट्यामुळेच टेंभू योजनेचे 85 टक्के पाणी मिळाले आहे. राजेवाडी तलाव हा सांगली पाटबंधारे विभागाला जोडावा, तरच राजेवाडी परिसरातील नागरिकांना या पाण्याचा लाभ होईल. राजेवाडी तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते. मात्र, उरमोडीकडे पाणी शिल्लक नाही व जिहे कटापूर योजना आठ महिन्यांची आहे. त्यामुळे टेंभू योजनेच्या कामाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT