Satara Loksabha : सातारा लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने जिल्ह्यात भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठकांवर जोर धरला आहे. महायुतीचे जिल्हा संयोजन आमदार जयकुमार गोरे यांनी सबंध जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने सातारा येथे भाजपच्या पदाधिकारी यांची एक बैठक झाली.
त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाच्या विचाराने आणि महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यात काम कशा पद्धतीने जबाबदारीने आपले काम पार पाडावे, याबाबत मार्गदर्शन केले. तर संयोजक जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठांनी सातारा लोकसभेसाठी दिलेला उमेदवार बहुसंख्य मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
महायुतीतील घटकपक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे व महायुतीच्या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महायुतीचे जिल्हा संयोजक भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे पार पडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी सुनील काटकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, अविनाश कदम, तसेच सर्व पदाधिकारी, सागर शिवदास, सुनील शिंदे, विठ्ठल बलशेठवार, संतोष कणसे, मनीषाताई पांडे, कविताताई कचरे, सुनीशा शहा, भीमराव पाटीलकाका, एकनाथ बागडी, विकास गोसावी, शंकरकाका शेजवळ, नीलेश नलवडे, दीपक ननावरे, विजय ढेकणे, अनिल भिलारे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक रवींद्र लाहोटी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
संयोजक जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. महायुतीतील घटकपक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे गरजेचे आहे, काम करीत असताना कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी पदाधिकारी यांनी घेण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.