Raju shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : राजू शेट्टी कोणा सोबत, प्रचाराचा नारळ फोडताच जाहीर केला निर्णय

Rahul Gadkar

Kolhapur Political News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अद्यापही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे सूत जमता जमत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे.

त्याबाबत अजून संभ्रमावस्था असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मेळावे घेत आगामी लोकसभेचा प्रचाराचा नारळ फोडला आहे.महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काय ठरले हे गुपितच आहे. मात्र, इचलकरंजी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सत्ताधारी आणि विरोधकांचे वाभाडे काढत स्वतंत्र लढण्याचा इशारा राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिला. सत्ताधारी आणि विरोधी या दोघांचेही हात बरबटलेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष मतदारांसमोर स्वतंत्रपणे जाणार आहे. मतदारांना जे करायचे आहे ते करतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. मकर संक्रांतनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित हातकणंगले मतदारसंघातील कार्यकत्यांचा स्नेहमेळावा वेदभवनमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेट्टी म्हणाले, सगळे जण स्वार्थासाठी पक्ष सोडून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. निकाल देतानाही चुकीच्या पद्धतीनेदिला जात आहे. हेही पात्र आणि तेही पात्र मग मतदार अपात्र आहेत का, असा प्रश्न पडतो.व्यवस्था पूर्णपणे बरबटलेली आहे.

त्याला स्वच्छ लोकसभा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सरकारचे धोरण महागाई यावर आवाज उठविण्याची कोणाची ताकद नाही. मीच त्यावर आवाज उठवू शकतो. अशी भूमिका शेट्टी यांनी स्पष्ट केली.

सगळं आधीच ठरलं...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी हातकलंगलीची लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असणार की नाही, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या पडद्यामागून सुरू असलेल्या हालचाली स्वाभिमानीला पाठबळ देण्याची शक्यता वर्तवली जाते.

अशातच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी काढण्यात आल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी अधिक सगळं ठरलं असल्याचे सांगत 'अंदर की बात' बोलून दाखवली होती. त्यामुळे शेट्टी आता कितीही सांगत असले तरी शेट्टींच्या स्वतंत्र लढण्यामागे आघाडीचाच हात असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT