Mahadevrao Mahadik Raju Shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti Meet Mahadevrao Mahadik : महादेवराव महाडिक अन् राजू शेट्टींच्या भेटीनं चर्चांना उधाण; काय म्हणाले?

Akshay Sabale

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघ ( Hatkangale Constituency Lok Sabha Election ) चर्चेत आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने ( Raju Shetti Vs dhairyasheel Mane ) यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. अशातच राजू शेट्टी आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट झाली ( Raju Shetti Meet Mahadevrao Mahadik ) आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महाविकास आघाडीनं ( Mahavikas Aghadi ) हातकणंगले ही जागा राजू शेट्टींसाठी सोडण्यासाठी तयारी दर्शवली होती. पण, राजू शेट्टींनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हेही इच्छुक आहेत. यात राजू शेट्टी आणि महादेवराव महाडिक यांच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भेटीनंतर दोघे काय म्हणाले?

"या भेटीनंतर आप्पा ( महादेवराव महाडिक ) माझ्याबरोबर असतील," असं सूचक वक्तव्य राजू शेट्टींनी केलं आहे. तर, महादेवराव महाडिकांनीही शेट्टींना मदत केल्याचं सांगितलं आहे. "शेट्टींना मी सुरूवातीपासून मदत केली आहे. शेट्टींचं काम आघाडी आणि पक्षापेक्षा वेगळं आहे. शेट्टींनी शेतकरी चळवळीला योग्य दिशा दिली," असं महाडिकांनी म्हटलं.

दरम्यान, 2019 मध्ये राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माने गट, शिवसेनेची ताकद आणि कारखानदारांच्या छुप्या मदतीच्या जोरावर धैर्यशील मानेंनी 96 हजार मतांनी राजू शेट्टींना पराभूत केलं होतं.

त्यात 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर धैर्यशील मानेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर धैर्यशील मानेंविरोधात हातकणंगले मतदारसंघात तीव्र भावना असल्याचं बोललं जात आहे. तर, महाविकास आघाडीकडून राजू शेट्टींना हातकणंगले मतदारसंघाची जागा सोडण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, शेट्टींनी अपेक्षित प्रतिसाद न देता 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

2019 चा निवडणूक निकाल -

धैर्यशील माने ( शिवसेना ) - 5,85, 776

राजू शेट्टी (स्वाभिमानी) - 4,89,737

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT