sushilkumar shinde-praniti shinde-Jyoti Waghmare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jyoti Waghmare : प्रणिती शिंदे किंवा शिंदेसाहेबांकडून अभिनंदनाचा फोन आला नाही; ज्योती वाघमारेंनी बोलून दाखवली मनातील भावना...

Praniti Shinde -Sushilkumar Shinde News : ज्योती वाघमारे यांनी सांगितले की राज्यसभा निवडीनंतर प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून अभिनंदनाचा फोन आला नाही.

विश्वभूषण लिमये

Solapur, 07 March : मला ताईंचा (खासदार प्रणिती शिंदे) अभिनंदनाचा फोन आला नाही किंवा सुशीलकुमार शिंदे साहेबांकडून अभिनंदन करणारा फोन आलेला नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपली नाराजीची भावना बोलून दाखवली.

प्रा. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रा. वाघमारेंसह सातही जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली असून बिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे. खासदार झाल्यानंतर डॉ. वाघमारे या प्रथमच सोलापुरात आल्या होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी वालचंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्या राजकारणात आल्या होत्या. खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासोबत वाघमारे यांनी काँग्रेस पक्षात काम केलेले आहे. ज्योती वाघमारे ह्या काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष होत्या. तसेच, त्यांचे वडिल हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते.

दरम्यान, आज त्यांना संजय राऊतांनी तुमचे अभिनंदन केले. कधी काळी तुम्ही ज्यांच्या कार्यकर्त्या होता, त्यासुद्धा लोकसभेच्या सदस्या आहेत, त्यांचा अभिनंदनाचा फोन आला होता का, असा सवाल विचारल्यानंतर त्यांनी ताई किंवा शिंदेसाहेबांचा मला अभिनंदन करणारा फोन आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊतसाहेब...शिंदेसाहेबांचे एक फोन करून अभिनंदन करा

खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या, संजय राऊत यांनी माझे अभिनंदन केले, हे मला माध्यमातून कळाले. पण हीच महाराष्ट्रची राजकीय संस्कृती आहे, विरोध हा फक्त पक्षापुरता असतो, राजकारणापुरता असतो. खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकार करते. राऊतसाहेब, माझं अभिनंदन करू नका, पण ज्या ज्योती वाघमारेला संसदेत पाठविण्याचे पुण्य ज्या एकनाथ शिंदे यांनी केले, त्यांचे एक फोन करून अभिनंदन करा.. ते रक्ताचे आणि संपत्तीचे वारसदार नसले तरी विचारांचे वारसदार आहेत.

जे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करायचे, पानटपरीचालकाला मंत्री, भाजी विकणाऱ्याला विरोधी पक्षनेता, रिक्षा चालवणाऱ्याला शिवसेना नेता केलं. आता त्याचप्रमाणे कष्ट करणाऱ्या आई बापाच्या मुलीला खासदार करणे, हा वारसा एकनाथ शिंदेंनी चालवला आहे, असेही डॉ वाघमारे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT