Jyoti Waghmare: ज्योती वाघमारे यांनाच उमेदवारी का? शिवसेनेच्या जुन्या नेत्यानं सांगितलं कारण

Jyoti Waghmare: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या कोट्यातील एका जागेसाठी डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर बिनविरोध निवड झाली आहे.
Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
Eknath Shinde and Jyoti Waghmare arrive together to file the nomination for the Rajya Sabha election in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Jyoti Waghmare: राज्यसभेसाठी शिवसेनेत अनेक जुने आणि दिग्गज नेते इच्छुक असतानाही या सर्वांना डावलून पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात तुलनेत नवख्या असलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असलं तरी त्यांनाच का उमेदवारी दिली याचं कारण शिवसेनेच्या एका जुन्या नेत्यानं सांगिलं आहे.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
Jyoti Waghmare: "भीमराज की बेटी अन् भाकरीचा संघर्ष..."; राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया

इच्छुकांची भाऊगर्दी

शिवसेनेचे सुरुवातीच्या काळातील नेते आणि ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं ते म्हणजे गजानन किर्तीकर. स्वतः किर्तीकर हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. त्याचबरोबर आनंदराव अडसूळ, संजय मंडलिक, संजय निरुपम, शायना एनसी आणि राहुल शेवाळे हे लोक इच्छुक होते. यांपैकी सुरुवातीला राहुल शेवाळे यांचं नाव अंतिम झाल्याची नुसतीच चर्चा होती. तर आपल्याला एकनाथ शिंदेंनी शब्द दिला होता असं आनंदराव अडसूळ यांनी सातत्यानं म्हटलं होतं. तर लोकसभा निवडणुकीतून मुलगा अमोल किर्तीकरसाठी माघार घेतलेले गजानन किर्तीकर हे देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. तर कोल्हापुरला संधी मिळावी म्हणून संजय मंडलिक यांनीही राज्यसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
जागतिक तेल वाहतुकीचे मार्ग कोणते? कुठून किती तेलाची होते वाहतूक?

वाघमारेंचं नाव योग्य का?

पण अखेर या सर्वच लोकांना डावलून ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. वाघमारे यांच्या उमेदवारीमुळं शिवसेनेतच नव्हे तर शिवसेनेच्या बाहेरही लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण यामागे एकनाथ शिंदे यांची रणनीती होती, हे आता समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे खुद्द गजाननं किर्तीकर यांनी आता वाघमारे यांचं नाव जाहीर केलं हे योग्यचं झालं असल्याचं म्हटलं आहे. त्याच कारण म्हणजे वर उल्लेख केलेल्या इतर कोणालाही राज्यसभेच्या जागेवरुन उमेदवारी दिली असती तर दुसरा इच्छुक नाराज झाला असता आणि बंडखोरीची शक्यता निर्माण झाली असती.

Jyoti Waghmare Rajya Sabha | Eknath Shinde Shiv Sena Candidate
Bihar CM : नितीश कुमार राज्यसभेवर जाणार! भाजपची मोठी खेळी? आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी 'ही' नावं चर्चेत

नाराज नाही - किर्तीकर

त्याचबरोबर जुन्यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत सर्वकाही मिळालेलं असतं. मला सुद्धा कुठल्या कारणासाठी उमेदवारी पाहिजे याची कैफियत मी मांडली. पण त्याच्या पलिकडे जाऊन ज्यावेळी पक्षाचा नेता असा विचार करतो की बहुजन समाजातील एका सुशिक्षित महिलेला जर आपण संधी दिली तर एक चांगला संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल, त्यामुळं मी या निर्णयाचं मी स्वागत करतो, मी याबाबत नाराज नाही, असंही किर्तीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com