jitendra Dudi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Hordings : साताऱ्यात बेकायदेशीर होर्डिंगचा बाजार; तब्बल 372 अनाधिकृत आढळले!

Illegal hoardings : मुंबईत वादळी पावसात होर्डिंग कोसळून 18 जणांचा बळी गेला. यानंतर राज्य सरकार व प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी राज्यभरातील होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारला.

Umesh Bambare-Patil

Satara hoardings News : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यात सर्वाधिक उमटले आहेत. जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत, सर्वच होर्डिंग काढण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सर्वाधिक होर्डिंग हे जिल्ह्यातील आठ पालिकांच्या हद्दीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मागविलेल्या अहवालात तब्बल 372 होर्डिंग अनाधिकृत असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार असून सध्या तरी धोकादायक व विना परवानगी असलेले 31 होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत. तर 141 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार आहे.

मुंबईत(Mumbai) वादळी पावसात होर्डिंग कोसळून 18 जणांचा बळी गेला. यानंतर राज्य सरकार व प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी राज्यभरातील होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंगवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका, बांधकाम विभाग व महामार्ग प्राधीकरण यांच्या अधिकाऱ्यांच्या समिती स्थापन करुन कारवाईच्या सूचना केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दुर्घटनेचे सातारा जिल्ह्यात पडसाद उमटले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी(Jitendra Dudy) यांनी सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, महामार्गाचे अधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांना ग्रामीण भागातील होर्डिंगचा अहवाल तयार करण्याची सूचना केली होती. तसेच धोकादायक होर्डिंग तातडीने हाटविण्याची सूचना केली होती. त्यानुसार अहवाल उपलब्ध झाला असून मोठ्याप्रमाणात होर्डिंग हटविण्यात येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील आठ पालिकांच्या हद्दीत तब्बल 543 होर्डिंग असून यापैकी परवानगी घेतलेले अधिकृत असे 171 होर्डिंग असल्याचे पाहणीत उघड झाले आहे. उर्वरित तब्बल 372 होर्डिंग बेकायदेशीर आहेत. ही बेकायदेशीर होर्डिंग(Illegal hoardings) काढणे किंवा नियमित करुन घेणे हाच आता पर्याय संबंधितांपुढे आहे. कारण यातील 31 होर्डिंग पाहणी दरम्यान, धोकादायक असून ती तातडीने हाटविण्याची सूचना करण्यात आली आहे.

तर 141 होर्डिंग(hoardings) नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार आहे. ऑडीटमध्ये पास झाले तरच हे होर्डिंग राहणार आहेत. अन्यथा त्यावर ही कारवाई होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाच जूनपर्यंत होर्डिंग नियमित करण्यासाठी मुदत दिली आहे. या दिलेल्या मुदतीत नियमित करण्याची कार्यवाही झाली नाही तर जिल्हा प्रशासन हे होर्डिंग्स स्वत:हून हटविणार असून त्यासाठी होणारा खर्च व दंड संबंधित मालकावर लावला जाणार आहे.

जिल्ह्यातील आठ पालिकांच्या हद्दीत असलेली होर्डिंगच्या उभारणीचे दर वेगवेगळे आहेत. आता बेकायदेशीर होर्डिंग काढण्याचे काम पालिकांच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात येत आहे. जेथे मोठी होर्डिंग आहेत, ती त्यांच्या मालकांना काढून टाकण्यास सांगितली आहेत. सहा जूननंतर जिल्हा प्रशासन सर्वच होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT