Shetkari Sangh Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापूर शेतकरी संघाच्या निवडणुकीत महायुतीसोबत काँग्रेसची आघाडी

Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील गट एकत्र आल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूरच्या राजकारणात कधी कोणासोबत युती होईल, याचा काही नेम नाही. कधी राष्ट्रवादी-भाजप एकत्र, तर कधी भाजप-काँग्रेस सहकार क्षेत्रात एकत्र येत असल्याचे दिसते. शेतकरी संघाच्या निवडणुकीत झालेली युती हे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकरी संघाच्या निवडणुकीत महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील गट एकत्र आल्याने त्याची चर्चा रंगली आहे. राज्याच्या राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते शेतकरी संघटना निवडणुकीत एकत्र येऊन राजकीय विचार नव्याने समोर आणला आहे. (In Kolhapur, Congress alliance with Mahayuti in the shetkari sangh election)

शेतकरी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस एकत्र येणार आहेत. तसेच, संघाच्या निवडणुकीत जुन्यांऐवजी नव्या लोकांना संधी दिली जावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव ठेवला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत. त्यानंतर कोणाला किती जागा याचा फॉर्म्युला तयार केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांपासून प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये रविवारी सायंकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची बैठक झाली. पालकमंत्री मुश्रीफ, आमदार विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. यावर कोणाला किती जागा द्याव्यात, याबाबत चर्चा झाली.

शेतकरी संघाच्या निवडणुकीत जुन्या संचालकांना संधी देण्याबाबत काहींनी आक्षेप घेतला. संघात अपहार झालेल्यांच्या काळातील जुन्या संचालकांना या वर्षी संधी द्यायला नको, तर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जावी, असाही प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, जुने असले तरीही संघात चांगले काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, याबद्दल उद्याच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला

संघाच्या एकूण १९ जागांपैकी भाजपला सर्वाधिक ५ जागा, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ४, जनसुराज्य ४, इतरांमध्ये शिवसेना शिंदे गटाला दोन जागा देण्याचा फॉर्म्युला सध्या तरी ठरला आहे. हे सर्व पक्ष एकत्र येत असले तरीही निवडणूक बिनविरोध होईल का? याबाबत शंका असून, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

निर्णय आज होणार?

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या वतीने केल्या जाणाऱ्या पॅनेलची नावे मंगळवारी (ता. ९ जानेवारी) जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत आणखी काही विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून जाहीर केला जाणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT