Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil On Alliance : शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेस मोठा भाऊ; जयंत पाटील म्हणाले...

Jayant Patil On Mahavikas Aghadi : लवकरच आमचा कोण उमेदवार आहे, जाहीर करु...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची मिळून राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या घडामोडींनंतर आघाडीत काँग्रेस पक्ष आता मोठा भाऊ, म्हणजेच मोठा पक्ष ठरला आहे. आता आगामी निवडणुकीसांठी जागा वाटपावर याचा काय परिणाम होणार? यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह हे अजित पवारांचे असल्याचे निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. यानंतर राज्यात राजकीय घमासान सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात संघटन बांधणीचा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. राज्यात काँग्रेस पक्ष मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेवर देखील त्यांनी मत मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले, "ज्या जागा पूर्वी या तिन्ही पक्षांतील ज्यांनी लढवल्या आणि निवडून आल्या, ते त्यांचे सिटींग सदस्य धरतात. खासदार गेले म्हणजे कार्यकर्ते जात नाही. हा निकष लावून त्या ठिकाणी त्या-त्या पक्षाला लढवण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे. त्यानुसार चर्चा चालू आहे. आम्ही एकत्रित बसल्यावर तिघांचा दावा करण्याचा अधिकार आहे. आणि तो दावा मेरीटवर आहे की नाही? यावर साधक-बाधक चर्चा आघाडीमध्ये होते".

नगर दक्षिणबाबत उमेदवार भाष्य ?

नगर दक्षिण लोकसभा उमेदवारीवर जयंत पाटील यांनी मोठे भाष्य केले. शरद पवार यांच्या गटाकडून आमदार नीलेश लंके यांचे नाव नेहमी चर्चेत येते. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. उमेदवार निश्चितीचे कुठपर्यंत आले आहे? यावर जयंत पाटील म्हणाले, "उमेदवार निश्चितीबाबत बरीच चर्चा झाली आहे. लवकरच आमचा कोण उमेदवार आहे, हे सांगू. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. ती महाविकास आघाडीच्या बैठकीत देखील सांगितले आहे. आता फायनल होईल".

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT