Kolhapur vidhansabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Assembly Election: राज्यात कोल्हापूर भारी! वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?

Kolhapur voter turnout highest in state elections: गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा विधानसभा निवडणुकीला मतांची टक्केवारी वाढली असून त्याचा धक्का कोणाला बसणार हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे.

Sachin Waghmare

Kolhapur News : राज्यात मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर सर्वात टॉपवर राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात 75 टक्केपेक्षा अधिक मतदान झाले आहेत. सर्वच मतदारसंघात महिला मतदारांनी चुरशीने मतदान केले असून वाढलेल्या मतदानाचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच समजणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा विधानसभा निवडणुकीला मतांची टक्केवारी वाढली असून त्याचा धक्का कोणाला बसणार हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे. दोन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत चार ते पाच टक्क्यांनी मते वाढली आहेत.

आजपर्यंतच्या इतिहासात ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला असतो. त्यावेळी विद्यमान प्रस्थापित आमदारांना धक्कादायक निकाल लागलेला असतो हा इतिहास आहे. त्यामुळे यावेळी वाढलेल्या मतांच्या टक्केवारीत किती प्रस्थापितांना धक्का बसणार याविषयी उत्सुकता आहे. गेल्या विधानसभेत कागलमध्ये 81.42 टक्के तर यंदा 81.72 टक्के झाले आहे. यातील वाढ तुलनेने कमी आहे.

कोल्हापूर दक्षिणमध्ये गेल्या निवडणुकीत 84.41 टक्के तर यंदा 84.94 टक्के झाली आहे. पण वाढलेली मतदानाची टक्के हे प्रस्थापितांच्या चिंतेत भर टाकणारे आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात झालेले सत्ता बद्दल, पक्ष फोडाफोडी, वाढलेली महागाई, महिला अत्याचार, लाडकी बहीण, शेतीसाठी विविध योजना, या विविध मुद्द्यांवरून महायुती व महाविकास (MVA) आघाडी समोरासमोर आले.

या दोन आघाड्यांमधील सुरू असलेल्या राजकीय युद्धामध्ये बंडखोरांनी आपली वेगळी वाट करत जिल्ह्यातील तीन मतदारसंघ चर्चेत आणले. याशिवाय जिल्ह्यातील कागल, दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील लढतीमुळे हे मतदार संघ चर्चेत राहिले आहेत. जिल्ह्यातील काही प्रमुख लढाईमध्ये निवडणूक प्रतिष्ठेवर गेल्यानंतर इर्षाने दोन्ही गट उतरले. त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे काही मतदारसंघात लक्षवेधी मतदारसंघात लक्षवेधी टक्केवारी वाढली आहे.

याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक राजकीय घडामोडी वेगळ्या आहेत. गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघात पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. तर पक्षांतर करून इकडे-तिकडे जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे मुद्देही मतदान वाढीबरोबरच निकालात प्रभावी ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT