Shahu Maharaj-Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली; मंडलिक-शाहू महाराज समर्थकांंमध्ये ‘सोशल वॉर’

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एक प्रश्‍न घेऊन महायुतीच्या विद्यमान खासदारांना छेडण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर रोज होत आहे. यामध्ये संजय मंडलिकांना उद्देशून निष्क्रीय खासदारांनी उद्योगांसाठी काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Rahul Gadkar

kolhapur, 22 April : ‘निष्क्रीय खासदार उत्तर द्याच !,’ ‘....यावर हा घ्या पुरावा...’ अशा पद्धतीने सोशल मीडियावर थेट आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. एवढेच काय तर खासदारांनी खुलासा केल्यानंतर...खुल्या चर्चेसाठी महाराज स्वतः येणार काय? असाही प्रतिप्रश्‍न पुढे आला आहे. रस्त्यावर, गल्ली-बोळांत, वाडी-वस्तीत ज्या पद्धतीने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे, तशीच निवडणूक आता सोशल मीडियावरही तापली आहे.

निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे ठरलेलेच असते. त्यामध्ये एका ठराविक पातळीवर हे आरोप-प्रत्यारोप थांबले नाहीत, तर त्याची ठिणगी पडते आणि पुढे खुन्नस निर्माण होते. त्यानंतर गुन्हे दाखल होऊन पेटलेला वाद थेट न्यायालयाच्या पायऱ्यापर्यंत जातो. हे अनेकवेळा सर्वांनी पाहिले आहे. यामध्ये आता सोशल मीडियाने भर घातली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Lok Sabha Constituency) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडल्या जात आहेत. रोज एक प्रश्‍न घेऊन महायुतीच्या विद्यमान खासदारांना छेडण्याचा प्रयत्न याच सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये संजय मंडलिकांना (Sanjay Mandlik) उद्देशून निष्क्रीय खासदारांनी उद्योगांसाठी काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यावर मंडलिक समर्थकांकडूनसुद्धा हा घ्या पुरावा म्हणून आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती, पत्रव्यवहारासह उत्तरात दिली आहे. एवढेच नव्हे; तर खुल्या चर्चेसाठी महाराज स्वतः येणार काय? असाही प्रतिप्रश्‍न केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार स्वतः आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा कशा पद्धतीने प्रचारात सक्रिय झाले आहेत, याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. रिल, स्टोरीसुद्धा पाहण्यास मिळत आहेत. नुकताच मधुरिमाराजे यांनी लहान मुले क्रिकेट खेळ असताना प्रचारादरम्यान त्यांच्यामध्ये जाऊन जोरदार बॅटिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संजय मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकसुद्धा कोणकोणत्या गावांत जाऊन प्रचार करीत आहेत, तेथे कसा प्रतिसाद मिळत आहे, त्याची रिल, स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फेक आहे... तरीही चालतंय..

मराठा आरक्षण आंदोलनावेळी सर्वच लोकप्रतिनिधींना गावबंदी केली होती. त्यावेळी नेत्यांना गावात येण्यास बंदी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याचाच उपयोग आता निवडणुकीत केला जात आहे. उमेदवारांना गावबंदी केली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याचाच संदर्भ घेत गावकऱ्यांनीही हे व्हिडिओ ‘फेक’ आहेत. ते मराठा आरक्षणावेळचे असल्याचाही खुलासा सोशल मीडियाद्वारे केला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT