Solapur NCP Leader  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : सोलापूर दौऱ्यापूर्वीच अजितदादांचा शरद पवारांना धक्का; प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत होणार प्रवेश

Vijaykumar Dudhale

Solapur News : सोलापूर दौऱ्यावर येण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाला धक्का दिला आहे. पवार गटातील प्रमुख नेत्यांचा आज (ता. १६ जानेवारी) दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार गटात प्रवेश होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने शहरातील पक्ष-संघटना मजबूत करताना शरद पवार गटाला धक्का दिल्याचे मानले जात आहे. (Leaders of Sharad Pawar group in Solapur will join Ajit Pawar group)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी (ता. १९ जानेवारी) सांगोला आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सांगोल्यात माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे पवार अध्यक्ष आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवेढ्यातील शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकत्र येणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर पवार हे सोलापूर शहरात मुक्कामासाठी येणार आहेत, त्यापूर्वीच अजितदादांनी पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

शरद पवार गटातील माजी नगरसेवक तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्याबरोबर इरफान शेख, गणेश पुजारी, साजिद पटेल यांच्यासह मान्यवरांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. हे सर्व नेते सध्या मुंबईत दाखल झाले असून दुपारी अडीचपर्यंत त्यांचा अजितदादा गटात प्रवेश होणार आहे.

तौफिक शेख यांनी ‘एमआयएम’च्या उमेदवारीवर सोलापूर शहरमध्ये मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना चांगलाच घाम फोडला होता. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत ‘एमआयएम’चे तेरा माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत दाखल झाले होते. ते सर्व तौफिक शेख यांचे नेतृत्व मान्य करतात. तेही तौफिक शेख यांच्या प्रवेशानंतर अजितदादा गटात दाखल होऊ शकतात.

आनंद चंदनशिवे हे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांची शहरात ताकद आहे. चंदनशिवे हे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेसमर्थक समजले जातात. ते चंदनशिवे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदासाठी त्यांचेही नाव चर्चेत होते.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच शरद पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पक्षप्रवेश करून धक्का दिल्याचे मानले जात आहे. आता शरद पवार गटाकडून काय हालचाली होतात, पक्षवाढीसाठी काय पावले उचलली जातात, हेही पाहावे लागेल.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT