Ruturaj patil and Krishnraj mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : महाडिक अन् पाटील कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले, इकडं युवा नेत्यांनी...

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी लोकसभा ( Loksabha Election 2024 ) आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक दिग्गज नेत्यांनी आणि युवा नेत्यांनी आपापली सोशल मीडियावरील अकाउंट सक्रिय केले आहेत. प्रचार आणि प्रसिद्धीसाठी कार्यकर्त्यांकडूनही फॅन फॉलोवर्स ग्रुप तयार करण्यात आले आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक आणि पाटील गटात सोशल मीडिया वॉर पेटलं आहे. दुसरीकडे दोन युवा नेत्यांनी दाखवलेली राजकीय संस्कृती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

कोल्हापुरातील महाडिक आणि पाटील गट सध्या इन्स्टाग्रामवर आमने-सामने आले आहेत. रिल्सच्या माध्यमातून एकमेकांना ट्रोल करणं सुरू आहे. सध्या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर टीका केली नसली, तरी सोशल मीडियात कार्यकर्त्यांनी राजकीय वैरत्व कायम ठेवलं आहे. पण, कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला वाद कोल्हापुरातील दोन युवा नेत्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविवारी ( 11 फेब्रुवारी ) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा 53 वा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. अशातच आमदार ऋतुराज पाटील ( Ruturaj Patil ) आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिकसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.

ऋतुराज पाटील आणि कृष्णराज महाडिक हे दोघं खुर्चीला-खुर्ची लावून एकत्र बसले होते. हे दोघे एकत्र बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण इन्स्टाग्रामवर पाटील विरुद्ध महाडिक गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या सोशल मीडिया वॉरला छेद देण्याचा प्रयत्न झाला, असेच या फोटोवरून म्हणता येईल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT