Eknath Shinde-jaykumar gore-shambhuraj desai-makrand patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : सातारा ZP अध्यक्षपदाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे भाष्य; गोरेंसह, शंभूराज अन्‌ मकरंदआबाही गॅसवर...

Eknath Shinde Statement : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा 15 दिवसांनंतरही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या विधानामुळे महायुतीतील समीकरणांबाबत संभ्रम वाढला असून जिल्ह्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 22 February : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा 15 दिवसांनंतरही कायम आहे. महायुतीमधील तीनही पक्षांनी अध्यक्षपद प्रतिष्ठेचे केले आहे, त्यामुळे साताऱ्यातील राजकीय तिढा वाढत चालला आहे. मात्र, आता त्यावर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाष्य केले आहे. ते करताना त्यांनी महायुतीचाच अध्यक्ष होईल, असे म्हटल्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचा होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 65 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 27 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस 20, शिवसेना 15, काँग्रेस एक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आणि अपक्ष एक असे संख्याबळ आहे. मात्र बहुमताचा 33 हा आकडा कोणत्याही एका पक्षाला गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे.

यापार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील दरे गावी आलेले उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी झेडपी अध्यक्षपदाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेबाबत स्थानिक पातळीवरील काही समीकरणे असली तरी अध्यक्ष हा महायुतीचा होईल. साताऱ्यातील जी राजकीय परिस्थिती आहे, त्यानुसार सगळीकडे वेगवेगळी परिस्थिती असते. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती आदींच्या निवडणुकांमध्ये महायुतीला कौल मिळाला आहे. त्यामुळे जनतेचा कौल मान्य करून स्थानिक समीकरणानुसार महायुतीचा अध्यक्ष होईल.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांना टार्गेट केले, याबाबत शिंदे म्हणाले, निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. मैत्रीपूर्ण लढतींमध्ये टोकाची टीका करायची नाही, असे आम्ही ठरवले होते. आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर काय झालं, हे मला माहिती नाही.

राज्यात, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एनडीए म्हणून काम करत आहोत. राज्यात महायुतीचे सरकार असून गेली साडेतीन वर्षे केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व तुमच्यात बैठक होऊन सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत तुम्ही ग्रीन सिग्नल दिला आहे का, या प्रश्नावर शिंदेंनी ‘त्यांनी तुम्हाला सांगितले आहे का? तुमच्याशी ते बोललेत का? असे प्रश्न विचारत अगोदर त्यांना विचारा. मग मला, असे सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT