Shivsena upatalukapramukh whatsapp status
Shivsena upatalukapramukh whatsapp status

Beed Crime : ‘दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र', शिंदेंच्या शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न अन् राज्यभर खळबळ

Shivsena upatalukapramukh whatsapp status : बीड जवळील म्हसोबा फाटा येथे धक्कादायक घडना उडकीस आली असून शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Published on
Summary
  1. बीड उपतालुकाप्रमुख भारत देवकते यांनी म्हसोबा फाटा येथे बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  2. साडी फाटल्यामुळे त्यांचा जीव वाचला असून नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

  3. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सवर चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो शेअर केला होता.

Beed Crime : बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा येथे धक्कादायक घटना समोर आली असून शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समुळे खळबळ बीडसह राज्यभर खळबळ उडाली असून आता सरपंच पती आणि ग्रामसेवकाचे नाव समोर आले आहे. तर सध्या या प्रकरणाची चौकशी पोलिस करत असून नेमके कारण काय, याचा तपास केला जात आहे. तर आत्महत्येचा प्रयत्न करणारा नेता उपतालुकाप्रमुख असून त्याचे नाव भारत तुळशीराम देवकते असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भारत देवकते ढेकणमोहा येथील म्हसोबा फाटा येथे झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र साडी फाटल्याने ते खाली पडले आणि त्यांचे प्राण वाचले.

सध्या त्यांच्यावर बीड रुग्णालयातील आयसीयू कक्षात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पण आत्महत्येपूर्वी देवकते यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि गळ्यात साडी बांधलेला फोटो पोस्ट केला होता.

Shivsena upatalukapramukh whatsapp status
Beed Crime News : तहसिलदार आशा वाघ अडचणीत, बनावट स्वाक्षऱ्या प्रकरण भोवलं; केज पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल

ज्यात त्यांनी, ‘दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र' असे लिहले होते. तर या चिठ्ठीत आपल्या मृत्यूसाठी सरपंचाचे पती आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरावे असा स्पष्ट उल्लेख होता. यामुळेच आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच देवकते यांनी, माझ्या मनात गावातील गायगोठा, विहीर, शेततळे यासारखी कामे नि:शुल्क दरात करण्याचे होते.

मात्र, सरपंच पती आणि ग्रामसेवक यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मनमानी कारभार आणि सततच्या मानसिक त्रासामुळेच आता आपण हे टोकाचे पाऊल उचलत असून जीवन संपवत आहे. या दोघांना माझ्या मृत्यूसाठी दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देवकते यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवलेल्या चिठ्ठीच केली होती.

तसेच त्यांनी, या निर्णयासाठी त्यांची पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातील कोणालाही दोषी धरू नये, असे आवाहन करत जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. पण आता या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून वातावरण ढवळून निघाले आहे.

Shivsena upatalukapramukh whatsapp status
Beed Crime : बीड पोलिसांचा गावगुंडांना दणका : हवेत फैरी, पिस्तुलीबरोबर स्टायलिश रिल्स् काढणाऱ्यांना बसणार चाप

FAQs :

1. भारत देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न कुठे केला?
म्हसोबा फाटा परिसरात बाभळीच्या झाडाला साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

2. त्यांची सध्याची प्रकृती कशी आहे?
त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत.

3. त्यांचा जीव कसा वाचला?
गळफासासाठी वापरलेली साडी फाटल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

4. आत्महत्येपूर्वी त्यांनी काय केले होते?
त्यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक चिठ्ठी आणि फोटो शेअर केला होता.

5. या घटनेमुळे काय प्रतिक्रिया उमटत आहेत?
बीड जिल्ह्यात आणि स्थानिक राजकारणात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com