Pune APMC : पुणे बाजार समिती गैरकारभार प्रकरणी केवळ नोटिसा; कारवाई नाहीच..., पणन संचालकांचा अधिकाऱ्यांना इशारा

Pune APMC market yard : आमदार खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फुलबाजारातील प्रतीक्षा यादी वगळून दिलेले परवाने, जी-५६ जागा, टपऱ्यांचे वाटप, पेट्रोल पंप ठेका तसेच इ निविदा न करता दिलेले टेंडर रद्द करण्याची घोषणा करत उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले होते.
Pune APMC market yard
Pune APMC market yard sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Feb : आमदार सदाभाऊ खोत यांनी बाजार समितीतील कामकाजाबाबत लक्षवेधी सूचना मांडल्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित गैरकारभाराचा मुद्दा विधिमंडळात देखील गाजला होता.

त्यानंतर शासनाने संबंधित प्रकरणांवरील कार्यवाही, अंमलबजावणी आणि कागदपत्रीय पुराव्यांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा उपनिबंधकांकडून सादर झालेला चौकशी अहवाल अपुरा व अस्पष्ट असल्याची नोंद घेत पणन संचालक संजय कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनपत्रातील प्रत्येक मुद्द्यावर ठोस तपशील, पुरावे आणि केलेल्या कारवाईसह सुधारित अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, त्यासंबंधीचे पत्र जिल्हा उपनिबंधक, सभापती आणि सचिवांना पाठविण्यात आले आहे.

Pune APMC market yard
Municipal worker Death : राजकारण्यांच्या चमकोगिरीने घेतला महापालिका कर्मचाऱ्याचा बळी, अनधिकृत होर्डिंग काढताना मोठा अपघात

तर आमदार खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फुलबाजारातील प्रतीक्षा यादी वगळून दिलेले परवाने, जी-५६ जागा, टपऱ्यांचे वाटप, पेट्रोल पंप ठेका तसेच इ निविदा न करता दिलेले टेंडर रद्द करण्याची घोषणा करत उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले होते.

Pune APMC market yard
Bhagwat Karad : भागवत कराड यांना राज्यसभेची लाॅटरी पुन्हा लागणार?

चौकशी सुरू झाली; परंतु सादर अहवालात केवळ नोटिसा व खुलासे यांचा उल्लेख असून ठोस निष्कर्ष आढळत नाहीत. कारवाई न झाल्यास उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com